Nanded: सुनील मोरे खोटं बोलले, कार नदीमध्ये टाकण्याआधी लेकरांसोबत…, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डोकं सुन्न करणारा खुलासा | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या 42 वर्षीय सुनील मोरे या शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह गाडी नदीत घातली होती.

News18
News18

नांदेड :  नांदेडमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह गाडी नदीत घालून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून  मोरे यांनी गाडी नदीत  घातली होती. मात्र गाडी नदीत घालण्यापूर्वीच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची धारदार शस्त्राने हत्या केल्याच उघड झालं आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या 42 वर्षीय सुनील मोरे या शिक्षकाने शुक्रवारी 16 जुलै रोजी सकाळी आपल्या दोन मुलांसह गाडी नदीत घातली होती. नांदेड-मूदखेड मार्गावरील आमदूरा पुलावरून भरधाव वेगाने त्याने गोदावरी नदीत गाडी घातली होती. मोरे यांच्या कारमध्ये त्याची 14 वर्षीय मुलगी सारा आणि 10 वर्षीय मुलगा सुमेध हे दोघे पण होते.

आत्महत्येआधी स्टेट्स आणि मित्रांना पाठवला मेसेज

गट शिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी शिक्षक दत्ता पवळे यांच्या त्रासाला कंटाळून मुलांसह आत्महत्या करत असल्याच स्टेटस त्याने व्हाट्सअपवर ठेवलं होतं. शिवाय तसा एक मेसेज देखील मयत सुनील मोरे याने मित्रांच्या ग्रुपवर टाकला होता. सुनील मोरे याच्या मृत्यू प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांवर ॲट्रॉसिटी आणि मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला होता.

दोन्ही मुलांची आधीच केली होती हत्या

दरम्यान, आपल्या दोन्ही मुलांसह त्याने गाडी नदीत घातली असं प्रथमदर्शनी वाटत होतं. मात्र, या निर्दयी पित्याने गाडी नदीत घालण्यापूर्वीच आपल्या दोन्ही मुलांची हत्या केली असल्याचं आता शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.  चाकूने मुलगी सारा आणि मुलगा सुमेध यांच्या छातीवर आणि पोटात वार करून त्यांची आधी हत्या केली होती. त्यानंतर नंतर दोन्ही मुलांच्या मृतदेहासह कार नदीत घालून आपलंही जीवन संपवलं. तिघांचे मृतदेह काढून शुकवारी शवविच्छेदन करण्यात आले. आज पोलिसाना शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दोन्ही मुलांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झालं. तेव्हा पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन मयत सुनील मोरे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Nanded: सुनील मोरे खोटं बोलले, कार नदीमध्ये टाकण्याआधी लेकरांसोबत…, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डोकं सुन्न करणारा खुलासा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *