Last Updated:
एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिजित पवार असे या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या घटनेने खोल कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
Nashik News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 10 जणांच्या मित्र मैत्रिणींचा एक ग्रुप दुगारवाडी धबधब्यावर पर्यटनासाठी आला होता. यावेळी धबधब्यावर पाण्याचा आनंद घेत असताना एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिजित पवार असे या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या घटनेने खोल कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर फिरण्यासाठी 10 जणांच्या मित्र मैत्रिणींचा एक ग्रुप पर्यटनासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अभिजित पवार खोल पाण्यात बुडाला होता. या घटनेनंतर त्याच्या मित्रांनी लगेचच वनविभाग व पोलिसांना तातडीने माहिती दिली होती. त्यानुसार पोलीस शिपाई कुणाल मोरे घटनास्थळी पोहोचत अभिजितला सीपीआर देत त्याचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला होता.पण अभिजीत काहीच प्रतिक्रिया देत नसल्याने कुणाल यांनी त्याला खांद्यावर उचलून ग्रामीण रुग्णालयात नेले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले होते.
अभिजित नवनाथ पवार हा नाशिकच्या जेलरोड परिसरात राहायचा. त्याच्या या अपघाती मृत्यूने त्याच्या प्रत्यक्षदर्शी असलेल्या तीन मित्रांना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे तिघांवर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.या घटनेचा त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर पर्यटकांनी पाण्याच्या ठिकाणी उतरताना अतिउत्साह टाळा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 16, 2026 11:58 PM IST
