Last Updated:
संध्याकाळी ६ जणांना ढिगाराखालून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी ६ जणांना तपासून मृत घोषित केलं.
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील मोशी इथं कचरा डेपोमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुघर्टनेमध्ये ज्याची भीती होती तेच घडलं. इमारतीच्या ढिगाराखालून आज चौथ्या दिवशी एकाच वेळी ६ जणांचे मृतदेह आढळले आहे. संध्याकाळी ६ जणांना ढिगाराखालून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी ६ जणांना तपासून मृत घोषित केलं. या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा हा ७ वर पोहोचला आहे.
मोशी कचरा डेपोजवळ ‘वेस्ट-टू-ENERGY’ प्रकल्पाची ३ मजली इमारत ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोसळली होती. मागील ४ दिवसांपासून बचावकार्य सुरू होतं. आज ११ जुलै रोजी संध्याकाळी इमारतीखालून ६ जणांना बाहेर काढण्यात आलं. या शोध मोहिमेमध्ये अक्षय सावंत आढळून आले असून त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आलं होतं. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर सायंकाळी सुनील कोरके (वय ४०, आळंदी) , सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी) , महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर) आणि नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी) यांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलवण्यात आलं असता आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी त्यांना तपासणीअखेर मृत घोषित केले आहे.
१) अक्षय सावंत (वय ३५, मोशी)
२) सुनील कोरके (वय ४०, आळंदी)
३) सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी),
४) महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर),
५) नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी)
६) रणजीत पाटील (वय २२, मोशी)
७) भावेश वाणी ( वय ३३ निगडी)
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोशी कचरा डेपोमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. “घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या विषयी संवेदनशिलता आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात विषारी वायू आहे त्यामुळे अडचण येत होत्या. अन्य काही जण अडकले आहेत त्यांचा शोध सुरू आहे. घटनेबाबत चौकशी चालू आहे. जे काही चौकशी अंती समोर येईल ते पाहून कारवाई केली जाईल’ अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
Pune,Maharashtra
Moshi Building Collapse: झुंज अपयशी ठरली! 4 दिवस इमारतीच्या ढिगाराखाली अडकलेल्या 7 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
