Mhada Lottery Mumbai Homes: मोठी बातमी: मुंबईतील म्हाडांच्या घरांसाठीची प्रतीक्षा संपणार, MHADA लॉटरीची तारीख अखेर जाहीर, कधी होणार घोषणा?


Mumbai Mhada Lottery 2026 मुंबई : मुंबईत घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. म्हाडा मुंबई (MHADA Mumbai Lottery) मंडळाच्या वतीने लवकरच मोठी घोषणा करण्यात येणाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुमारे अडीच हजार घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपणार (Mhada Lottery 2026) असून गेल्या तीन महिन्यांपासून सोडतीच्या तारखेच्या प्रतीक्षेत असेलला अर्जदारांना लवकर दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात सोडतीसंदर्भात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तर म्हाडाकडून सोडतीचा अधिकृत कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे.

दरम्यान,  म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे 30 मार्च रोजी मुंबईतील दोन हजार 640 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. या योजनेसाठी तब्बल 75 हजार 366 अर्ज प्राप्त झाले. सुरुवातीला 15 मे रोजी संगणकीय सोडत काढण्याचे नियोजन होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी अर्ज आल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आणि सोडतीची तारीख 5 जून अशी निश्चित करण्यात आली. त्यानंतरही अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. तसेच, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर नव्या तारखेची घोषणा करण्याचे म्हाडाने नमूद केले. मात्र, जुलैचा अर्धा महिना उलटूनही सोडतीबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने अर्जदारांमध्ये नाराजी वाढू लागली होती. अखेर आता हि प्रतीक्षा संपणार असून म्हाडाकडून सोडतीचा अधिकृत कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे.

Mumbai Mhada Lottery 2026 : 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त

मुंबई मंडळाने 30 मार्च 2026 रोजी कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांसाठी 2640 सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर केली होती. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145, अल्प उत्पन्न गटासाठी 858, मध्यम उत्पन्न गटासाठी 798 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 839 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी बांधकाम सुरू असलेल्या सदनिकांच्या गटातील कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील संकेत क्रमांक 538 व 539 मधील 1221 सदनिकांच्या विक्री किमतीत 7.5 टक्के कपात करण्यात आली. मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या 1221 सदनिकांपैकी 610 सदनिका नवीन संकेत क्रमांक 538-अ व 539-अ अंतर्गत केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. या निर्णयामुळे उच्च उत्पन्न गटातील अधिकाधिक नागरिकांना आधुनिक सुविधा असलेले आणि परवडणाऱ्या किमतीतील घर मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली व त्यासही अर्जदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. संगणकीय सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ याबाबतची सविस्तर माहिती पुढील काळात म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *