Messi Hat-trick: मेस्सीने 200व्या सामन्यात रचला इतिहास, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली पहिली हॅटट्रीक – Marathi News | FIFA World Cup 2026 Messi creates history in his 200th match scores his first hat trick in the opening match against Algeria


Messi Hat-trick: मेस्सीने 200व्या सामन्यात रचला इतिहास, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली पहिली हॅटट्रीकImage Credit source: Todd Kirkland/Getty Images

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मेस्सीने ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. लियोनल मेस्सीने पहिल्याच सामन्याच अल्जीरियाविरुद्ध खेळताना गोल मारत हॅटट्रीक नोंदवली. या तीन गोलसह मेस्सीने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोलची बरोबरी साधली आहे. मेस्सीने हा विक्रम अर्जेंटिनासाठी 200 सामना खेळताा नोंदवला आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे. फिफी वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात मेस्सीने गोलची हॅटट्रीक पहिल्यांदाच मारली आहे. तर आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत 11व्यांदा त्याने ही कामगिरी केली आहे. या हॅटट्रीकसह त्याने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोल मारणाऱ्या जर्मनीच्या मिरास्लोव क्लोजशी बरोबरी केली आहे. त्याने 16 गोल मारत विक्रम रचला होता. आता मेस्सीने त्याच्या 16 गोलशी बरोबरी केली असून त्याच्या पुढे जाण्याची संधी आहे. कारण या स्पर्धेत मेस्सीकडे अजून बऱ्याच संधी आहेत.

मेस्सीची वर्ल्डकप स्पर्धेत पहिलीच हॅटट्रीक!

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खेळताना अल्जीरिया विरुद्ध गोल मारण्याची सुरूवात 17व्या मिनिटापासून झाली. त्याने या सामन्याच्या 17व्या मिनिटाला पहिला गोल मारला. या गोलसह अर्जेंटीनाने पहिल्या हाफमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये लियोनल मेस्सी आणखी आक्रमक झाला. त्याने 60व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाला 2-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यामुळे अर्जेंटीनाचा पहिला विजय पक्का झाला होता. कारण अल्जीरिया पहिल्या गोलसाठी खूपच धडपड करत होती. पण त्यांना काही शक्य झालं नाही. दुसरीकडे मेस्सी अल्जीरियाचं डिफेन्स उद्ध्वस्त करण्यात पूर्णपणे यशस्वी ठरला. त्याने तिसरा गोल डिफेन्स भेदून मारला. यासह त्याने हॅटट्रीक पूर्ण केली.

सहा वर्ल्डकप खेळणारा पहिला फुटबॉलपटू

फीफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अल्जीरियाविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच मेस्सीने विक्रमाची नोंद केली होती. मेस्सी त्याच्या फुटबॉल कारकीर्दीतील सहावा फुटबॉल वर्ल्डकप खेळत आहेत. यासह अशी कामगिरी करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. आतापर्यंत अशी कामगिरी कोणीच केली नव्हती. पण पुढच्या सामन्यात रोनाल्डो या विक्रमाची बरोबरी करेल. दुसरीकडे, मेस्सीने तीन गोल मारल्याने या प्लेयर ऑफ द मॅच ठरला. त्याच्या तीन गोलवर अर्जेंटीनाने अल्जीरियाला 3-0 ने पराभूत केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *