जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना, त्या ठिकाणी जमलेल्या अफाट गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने नागरिकांचे मोबाईल (Manoj Jarange Patil Mumbai) आणि पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांना (Manoj Jarange Patil Mumbai) निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक समर्थक व नागरिक एकत्र आले होते. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने हातसाफ केला; मात्र, हा प्रकार उपस्थित आंदोलक आणि नागरिकांच्या तात्काळ लक्षात आला. सतर्क आंदोलकांनी चोरट्याला जागेवरच रंगेहाथ पकडले आणि चांगलाच चोप दिला. यानंतर संतप्त नागरिकांनी या चोरट्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले.(Manoj Jarange Patil Mumbai)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथून मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याच्या आपल्या निर्धारावर ठाम राहत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अंतरवाली सराटीमधून निघताना त्यांच्यासोबत त्यांचे मोजके समर्थक, दोन गाड्या आणि दोन रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) होत्या. निघण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती, परंतु त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि ते डिफेंडर गाडीतून मुंबईच्या दिशेने निघाले. ते निघण्याच्या वेळी अंतरवालीमध्ये समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मनोज जरांगे मुंबईला निघत असताना चोरट्यानी डल्ला मारल्याचं दिसून आलं. गर्दीचा फायदा घेत मोबाईल आणि पैसे चोरले, पण आंदोलक आणि नागरिकांनी चोराला पकडलं, चोराला चोप देऊन या पोलिसांच्या स्वाधीन केलं, या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.(Manoj Jarange Patil Mumbai)
मनोज जरांगे पाटील यांच्या या प्रवासाचे चार मुख्य टप्पे असणार आहेत. त्यांचा पहिला मुक्काम पाटोदा येथे, दुसरा श्रीगोंदा येथे, तिसरा पुण्यातील हडपसर येथे आणि त्यानंतर १९ तारखेला ते मुंबईत पोहोचणार होते. मात्र, त्यांनी मुंबई पोलिसांकडे केलेल्या तिसऱ्या अर्जात १८ तारखेची परवानगी मागितली असून, आझाद मैदानावर ५० सहकाऱ्यांसह उपोषण करण्यासाठी ही परवानगी मागण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या दोन अर्जांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तर तिसऱ्या अर्जावर अजूनही पोलिसांकडून काहीही उत्तर देण्यात आलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. सध्या मुंबईत गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जात असून, राज्यभरातून व देशभरातून प्रचंड गर्दी मुंबईत येते. या काळात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, नियमांची पायमल्ली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच पोलिसांवर अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी गणेशोत्सवाच्या काळात केवळ जरांगे पाटीलच नव्हे तर इतर कोणत्याही आंदोलनाला परवानगी न देण्याचे धोरण पोलिसांनी स्वीकारले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गणेशोत्सवानंतरच अशा आंदोलनांच्या परवानगीचा विचार केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.
उपोषणाची जागा सोडली, गाडीत बसताच जरांगे रडले
अंतरवाली सराटीमधील उपोषणाची जागा मनोज जरांगेंनी सोडली, गाडीत बसताच माध्यमांसी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवायचा आणि तीच परवानगी समजायची, माझं सगळ्यांना आवाहन आहे की शांत राहा. तुमच्या लेकरांसाठी मी लढेन. सरकारने मला चौकोनी घेरलं आहे. तुम्ही माझ्यासोबत राहा. मी जिवंत असो की नसो तुम्ही समाज मोठा करा. पक्षाला जीव लावू नका, समाजाला जीव लावा. मी मुंबईला जातोय. तुम्ही आशीर्वाद द्यायला या, मला मारायचं तर मारू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, पायात आणि पोटात आग होते, अशी भावना देखील यावेळी मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?