Lucky Zodiac Signs On 5 July 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या 5 जुलैचा दिवस आहे. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, शनिदेवाच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर सूर्यदेवाची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. या काळात तुमच्या करिअरला चांगली प्रगती मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये चांगली वाढ होईल. घरातील वातावरण आनंदी असणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी उद्याचा दिवस भरभराटीचा असणार आहे. करिअरमध्ये चांगले सकारात्मक बदल पाहायला मिळतील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार अनुकूल असणार आहे. तुमची कामे नियोजित वेळेत पू्र्ण होतील. तसेच, करिअरमध्ये अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. लहान मुलांकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग जुळून येतील. मात्र, हा प्रवास सुखाचा असेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Budh Gochar 2026 : 7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा