Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येणार, जुलैचा नवा आठवडा धनलाभाचे संकेत; कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 6 To 12 July 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – या आठवड्यात नातेसंबंध अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत प्रामाणिक संवाद साधल्यास जुने गैरसमज दूर होतील. अविवाहितांना मित्र किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते. प्रेमप्रकरणात घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

करिअर (Career) – करिअरच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि मेहनतीचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश मिळेल.

आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन आठवड्यात आर्थिक स्थिती स्थिर राहील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मात्र अनावश्यक खरेदी आणि दिखाऊ खर्च टाळणे योग्य ठरेल.तरच पैसा येईल

आरोग्य (Health) – मानसिक ताण कमी करण्यासाठी योग, ध्यान आणि पुरेशी झोप घ्या. डोळ्यांचा किंवा मानेचा किरकोळ त्रास जाणवू शकतो.

वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – जोडीदारासोबत विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अविवाहितांसाठी विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते.

करिअर (Career) – या आठवड्यात नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी राहतील. व्यवसायात नवीन करार किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी वाद टाळा.

आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मोठे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.

आरोग्य (Health) – आठवड्यात पचनसंस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाणी पुरेसे प्या.

हेही वाचा :

Lord Shiv: शिवलिंगासमोर भाविक 3 टाळ्या का वाजवतात? काय आहे यामागील महत्त्व, शास्त्र अन् फायदे? जाणून व्हाल थक्क…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *