LPG Rate Today : आज तुमच्या शहरात गॅस सिलेंडरची किंमत किती ? 2 जूनचे दर घ्या जाणून – Marathi News | LPG Gas Price: June 2, 2026 Update Commercial Cylinders Costlier, Domestic Unchanged


LPG Price Today 2 June 2026 : मंगळवार, 2 जून 2026 रोजी एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही नवीन बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी सोमवार, 1 जून रोजी जाहीर केलेले दर कायम ठेवले आहेत. मात्र नव्या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती, असं असलं तरीही घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. लहान 5-किलोचे गॅस सिलेंडर देखील महाग झाले आहेत. तुमच्या शहरात घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर किती ते जाणून घेऊया.

घरगुती LPG सिलेंडर (14.2 KG) चे लेटेस्ट दर –

कमर्शियल LPG सिलेंडर (19 KG) चे लेटेस्ट दर –

5 किलोचा सिलेंडरही महागला

तेल कंपन्यांनी 5 किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी (एफटीएल) सिलेंडरच्या दरातही वाढ केली आहे. दिल्लीत त्याची किंमत 821.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. हे नवीन दर 1 जूनपासून लागू झाले आहेत.

क्या वाढले कमर्शिअल सिलेंडरचे दर ?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतींमधील चढउतारामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यवसायांच्या खर्चावर होऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांनाही फटका बसू शकतं, हॉटेलिंग महागू शकतं.

मात्र असं असलं तरीही घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ न झाल्याने लाखो ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पण येत्या काळात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ होऊन अन्नपदार्थ आणि पेयांच्या किमती वाढू शकतात.

तुमच्या शहरातील रेट असे करा चेक

एलपीजी सिलेंडरचे लेटेस्ट दर हे इंडियन ऑइल, भारत गॅस आणि एचपी गॅसच्या अधिकृत वेबसाइटवर तपासता येतात. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला नवीन दर जाहीर करतात. तुम्ही तिथे ते चेक करू शकता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *