Chinmay Mandlekar On Mandar Devasthali: ‘दिग्दर्शक म्हणून त्याची कला, कोणीच हिरावू शकत नाही…’; पैसे बुडवल्याचे आरोप असणाऱ्या मंदार देवस्थळींबाबत चिन्मय मांडलेकर भरभरुन बोलला


Chinmay Mandlekar On Mandar Devasthali: सध्या स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीनं प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवाणी घातली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्टार प्रवाहनं नव्या मालिकांचा (Star Pravah New Serial) धमाका प्रेक्षकांसाठी आणला आहे. एक, दोन नाहीतर तब्बल सहा नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येऊ घातल्या आहेत. या सहा मालिकांची चर्चा आहेच, पण त्यातल्या त्यात ‘मराठी मिडियम’ (Marathi Medium) या गाजलेल्या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘मराठी मिडियम’ या मालिकेचं लेखन चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) करणार असून दिग्दर्शन मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) करणार आहेत. मंदार देवस्थळी अनेक वर्षांनी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा पदार्पण करणार असल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर मालिकेबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये चिन्मय मांडलेकरनं मंदार देवस्थळी यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. 

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर (Marathi Actor Chinmay Mandlekar) यानं नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना चिन्मयनं आपल्या आगामी मालिकेबाबत सांगितलं आहे. तसेच, त्यानं खूप दिवसांनी छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या मंदार देवस्थळींचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. 

अभिनेता चिन्मय मांडलेकर मंदार देवस्थळींबाबत नेमकं काय म्हणाला? (Chinmay Mandlekar Praises Director Mandar Devasthali)

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाला की, “माझ्यासाठी मंदार देवस्थळी यांची प्रतिमा माझ्या पहिल्या मालिकेचा दिग्दर्शक, माझ्या पहिल्या चित्रपटाचा दिग्दर्शक, एक अत्यंत उत्तम दिग्दर्शक, एक संवेदनशील व्यक्ती, हीच माझ्यासाठी त्यांची प्रतिमा आहे. त्याच्याव्यतिरिक्त जे काही झालं असेल, इतरांची त्यांच्याबद्दल जी काही मतं असतील, ती मी काही खोडून नाही काढणार. कारण, हा एका प्रक्रियेचा भाग आहे…”

“एक दिग्दर्शक म्हणून त्यांची कला आपण कोणीच त्यांच्याकडून हिरावून नाही घेऊ शकत. हा विश्वास फक्त माझा नाहीये. हा विश्वास निर्मात्यांचाही आहे, हा विश्वास मालिकेचाही आहे. तो एक दिग्दर्शक नाही तर तो माझा एक चांगला मित्रसुद्धा आहे. ज्यांनी सुरुवातीला मला मालिका क्षेत्रातील धडे दिले, त्यांच्यापैकी तो एक आहे. सर्व मळभ पुसून त्यानं पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी घ्यावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि या मालिकेच्या निमित्तानं जर ते होणार असेल, तर मला खूप आनंद आहे…”

दरम्यान, ‘वादळवाट’ फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळी बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. ‘वादळवाट’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘आपली माणसं’ यांसारख्या टीव्हीवर इतिहास घडवणाऱ्या सुपरहिट मालिका दिल्या आहेत. पण, अनेक कलाकारांनी त्यांच्यावर पैसे बुडवल्याचे गंभीर आरोप केलेत. ‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेता शशांक केतकरनं तर आरोपांची मालिकाच व्हिडीओ शेअर करत केलेली. एकीकडे पैसे बुडवल्याच्या कलाकारांच्या आरोपांमुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक मंदार देवस्थळी आता नव्या मालिकेमुळे चर्चेत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Who Is 33 Year Old Yudhvir Ahlawat: वय 33, पण साकारली 16 वर्षांच्या मुलाची भूमिका; सैफ अली खानच्या सीरिजमधल्या ‘या’ अभिनेत्यानं IMDb वर शाहरुख-ऐश्वर्यालाही टाकलं मागे

ABP माझाच्या बातम्या LIVE… 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *