L Balaji Appointed India A Head Coach For Australia A Series : भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीची भारत अ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध पुदुचेरी येथे होणाऱ्या मालिकेसाठी बालाजीवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेत भारत अ संघ दोन अनधिकृत कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील मालिकेला 22 सप्टेंबरपासून पुदुचेरी येथे सुरुवात होणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या संपूर्ण मालिकेसाठी लक्ष्मीपती बालाजी यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या मालिकेनंतरही ते भारत अ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कायम ठेवणार आहेत की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व
ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये देवदत्त पडिक्कल भारत अ संघाचे नेतृत्व करतील. तर तीन एकदिवसीय सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी असेल. दोन्ही स्वरूपांमध्ये संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी बालाजी सांभाळतील.
भारतासाठी 43 आंतरराष्ट्रीय सामने
लक्ष्मीपती बालाजीने भारतासाठी 8 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. स्विंग गोलंदाजी, अचूक टप्पा आणि दिशेवर नियंत्रण यासाठी तो ओळखला जातो. 2004 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर त्यांनी केलेली कामगिरी विशेष चर्चेत राहिली होती.
🚨 NEW COACH FOR INDIA A 🇮🇳
Lakshmipathy Balaji will be the Head Coach of India A for this series against Australia A. [Kushan Sarkar] pic.twitter.com/F4uwK01FMq
— Johns. (@CricCrazyJohns) September 20, 2026
आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळला (L Balaji Appointed India A Head Coach For Australia A Series)
बालाजीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना प्रभावी कामगिरी केली. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात हॅट्ट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. त्यांनी आयपीएलमध्ये एकूण 73 सामने खेळताना 76 विकेट्स घेतल्या आहेत. खेळाडू म्हणून कारकीर्दीनंतर बालाजीने प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या प्रशिक्षण संघाचा तो भाग होता, तर तामिळनाडू संघासोबतही त्याने प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील प्रशिक्षणाचा त्यांना चांगला अनुभव आहे.
हे ही वाचा –