June Grah Gochar 2026 : जून महिन्यात 5 मोठ्ठ्या ग्रहांचं महासंक्रमण; ‘या’ 4 राशींच्या हातात खेळेल पैसा, बॅंक बॅलेन्सही होईल दुप्पट


June Grah Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिना (June 2026) सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. द्रिक पंचांगानुसार, हा जूनचा महिना फारच खास असणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच 2 जून 2026 रोजी देवगुरु बृहस्पतीचं कर्क राशीत महासंक्रमण होणार आहे. त्यानंतर, 8 जून रोजी शुक्र ग्रहसुद्धा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर, 22 जून रोजी बुध ग्रहसुद्धा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देव 15 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. या ठिकाणी बुध ग्रहाबरोबर युती होणार आहे. 21 जून रोजी मंगळ ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्यात सर्व ग्रहांची ही अद्भूत चाल फार खास मानली जाणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात आनंद राहील. आत्मविश्वास वाढेल आणि समाजात मान-सन्मान मिळेल. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी जूनचा महिना फार खास असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, व्यवसायिकांशी तुम्ही संपर्कात याल. उत्पन्नाची नवी साधने निर्माण झाल्यामुळे भविष्यात त्याचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमचे जुने रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सूर्य आणि मंगळ ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढेल. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. नोकरीत सकारात्मक परिणाम मिळतील. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी देखील हा काळ कल्याणकारी असणार आहे. या राशीच्या दहाव्या चरणात सूर्य ग्रहाच्या प्रभावाने तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाची अधिक साधने तुमच्यासमोर निर्माण होतील. तसेच, या कालावधीत तुम्हाला एखादी चांगली शुभवार्ता देखील मिळू शकते. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

जून महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमणाचा मिथुन राशीवर सकारात्मक परिणाम होणार आहे. या कालावधीत उत्पन्नाची नवी साधनं तुमच्यासमोर निर्माण होतील. तसेच, व्यवसायात तुम्ही नवीन योजनांचा लाभ घ्याल. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी जूनचा महिना करिअर आणि धनसंपत्तीच्या बाबतीत फार खास असणार आहे. या कालावधीत तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल आहे. 

हे ही वाचा :                                    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Gochar 2026 : शनिचं बॅक टू बॅक संक्रमण! 2026 वर्षाच्या शेवटी तब्बल 4 वेळा चालीत होणार बदल, ‘या’ 4 राशींवर होणार पैशांची छप्परफाड कमाई

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *