Jeetendra Nephew Award Winning Director: बॉलिवूडचे (Bollywood News) सुपरस्टार जितेंद्र (Jeetendra) यांची मुलं, तुषार कपूर (Tushar Kapoor) आणि एकता कपूर (Ekta Kapoor), ही हिंदी चित्रपट (Hindi Films) आणि टेलिव्हिजन (TV Serials) क्षेत्रातील प्रसिद्ध नावं आहेत. तुषार कपूर ‘गोलमाल’ सीरीज आणि ‘क्या कूल हैं हम’ सारख्या सिनेमांसाठी ओळखला जातो, तर एकता कपूर यांना ‘टीव्ही क्वीन’ (Queen of TV) म्हटलं जातं, त्यांनी ‘भूत बंगला’ (Bhooth Bangla) या सिनेमापासून ते ‘नागिन’ (Nagin) सारख्या मालिकांपर्यंत अनेक शोज प्रोड्यूस केलेत. पण, तुम्हाला माहीत आहे का? जितेंद्र यांची फक्त मुलंच नाहीत, तर पुतण्याही बॉलिवूडमधील एक दिग्गज आहे. त्यांचे जवळचे लोक त्यांना ‘गट्टू’ नावानं ओळखतात. आम्ही ज्या दिग्दर्शकाबद्दल बोलतोय, त्याचं नाव अभिषेक कपूर. 6 ऑगस्ट 1971 रोजी मुंबईत जन्मलेल्या अभिषेक कपूर यांनी 1996 मध्ये ‘उफ्! ये मोहब्बत’ आणि ‘आशिक मस्ताने’ सारख्या सिनेमांमधून मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जितेंद्र हे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचे काका आहेत, ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे.
अभिषेक कपूर यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले (Abhishekh Kapoor Movies)
अभिषेक कपूर यांचे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले आणि स्टार अभिनेता बनण्याचं त्यांचं स्वप्न एका रात्रीत भंग पावलं. पण, अभिषेक कपूर यांची कहाणी तिथेच संपली नाही. उलट, इथूनच एका अशा रंजक प्रवासाची सुरुवात झाली ज्यानं भारतीय सिनेसृष्टीला एक असाधारण सिनेमा-दिग्दर्शक दिला. त्यांच्या दिग्दर्शनातील पहिलाच सिनेमा, ‘आर्यन: अनब्रेकेबल’ (2006) हा स्पोर्ट्स ड्रामा सिनेमाही व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला. त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा ते एका स्विमिंग पूलच्या काठावर बसून आपल्या आयपॉडवर ‘डेव्ह मॅथ्यूज’ आणि ‘यू-2’ (U2) यांचं म्युझिक ऐकत होते. त्यावेळीच त्यांच्या मनात एका अशा रॉक बँडच्या कथेची कल्पना आकारास आली, जो बँड इंग्रजीऐवजी हिंदी भाषेत गाणी सादर करेल.

दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली (Abhishekh Kapoor As Director)
या कल्पनेतूनच 2008 मधील ‘कल्ट क्लासिक’ सिनेमा ‘रॉक ऑन!!’ (Rock On!!) साकारला गेला. त्यांनी फरहान अख्तरला, ज्यानं सिनेमात काम करण्यासाठी दिग्दर्शनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला, त्याला यात मुख्य भूमिकेत घेतलं. तर अर्जुन रामपालवर एक गंभीर आणि महत्त्वाची भूमिका सोपवली.
या सिनेमाचं संगीत शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटानं अवघ्या पाचच दिवसांत तयार केलं होतं. हिंदीतील सर्वोत्तम फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकल्यामुळे, अभिषेक कपूर रातोरात एक प्रस्थापित दिग्दर्शक आणि लेखक बनला.
चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित सिनेमातून प्रसिद्धीच्या शिखरावर
त्यांनी आपली पत्नी प्रज्ञा कपूर यांच्यासोबत ‘गाय इन द स्काय पिक्चर्स’ (Guy in the Sky Pictures) ही निर्मिती संस्था सुरू केली, ज्याद्वारे ते उत्कृष्ट आणि प्रभावी कथांवर आधारित सिनेमांची निर्मिती करत आहेत. चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित 2013 मधील ‘काई पो चे!’ (Kai Po Che!) सिनेमाद्वारे त्यांनी सुशांत सिंह राजपूत आणि राजकुमार राव यांना बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी दिली. विशेष म्हणजे, जेव्हा संगीतकार अमित त्रिवेदी यांनी अवघ्या काही दिवसांत गाणी तयार केली, तेव्हा अभिषेक कपूर यांना सुरुवातीला ती ‘कॉपी-पेस्ट’ असावीत अशी शंका आली होती; मात्र, तीच गाणी पुढे जाऊन त्या सिनेमाचा आत्मा ठरली. त्याचप्रमाणे, 2018 मधील ‘केदारनाथ’ (Kedarnath) या दोन भिन्न धर्मांतील व्यक्तींच्या प्रेमकथेवर आधारित सिनेमातून त्यांनी सारा अली खानला सिनेसृष्टीत आणलं. या सिनेमाची पार्श्वभूमी 2013 मधील विनाशकारी महापुराची होती. या सिनेमातील ‘नमो नमो शंकरा’ (Namo Namo Shankara) हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की, त्याला युट्यूबवर एक बिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत.
एका ट्रान्सवुमनची मांडलेली कहाणी… (Chandigarh Kare Aashiqui Movie)
अभिषेक कपूर यांच्या कथा केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नसून त्या सामाजिक संकेत आणि रूढींनाही आव्हान देतात. 2021 मध्ये प्रदर्शित झालेला ‘चंदीगड करे आशिकी’ हा मुख्य प्रवाहातील अशा पहिल्या व्यावसायिक सिनेमांपैकी एक होता, ज्यानं एका ट्रान्स महिलेची प्रेमकथा पडद्यावर मांडली. आपल्या कारकिर्दीत अभिषेक कपूर यांनी अपयशाकडे एक उत्तम शिक्षक म्हणून पाहिलं. त्यांचं असं मानणं आहे की, सिनेसृष्टी विकसित होत आहे आणि आर्ट, व्यावसायिक सिनेमा यांमधील सीमारेषा आता अधिकाधिक पुसट होत चालली आहे.
‘आझाद’द्वारे राशा थडानी आणि अमन देवगण यांचं पदार्पण (Rasha Thadani Aman Devgan Debut With Azaad)
17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झालेला आणि राशा थडानी, अमन देवगण यांच्या पदार्पणाचा साक्षीदार ठरलेला ‘आझाद’ हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सिनेमा (पिरियड ड्रामा) बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या सिनेमानं केवळ 5 कोटी रुपयांची कमाई केली. असं असूनही, त्यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, “स्वप्न ‘हिट’ किंवा ‘फ्लॉप’ होत नाहीत, ती पूर्ण होतात…” 4 मे 2015 रोजी स्वीडिश अभिनेत्री प्रज्ञा यादव यांच्याशी विवाह करणारे अभिषेक कपूर आता दोन मुलांचे वडील आहेत आणि एक आनंदी कौटुंबिक जीवन जगत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :