Beauty Influencer Nisha Chauhan Death: सोशल मीडियाला हादरवणारी घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये इन्फ्ल्युएंसर निशा चौहान (Nisha Chauhan) हिची हत्या करण्यात आली (Social Media Influencer) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास निशाचा पती प्रदीप चौहानने चाकूने वार करुन तिची हत्या केली. वयाच्या 40 व्या वर्षी तिचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर निशाचा पती प्रदीप चौहानने स्वत:वर चाकूने वार करुन घेतले असल्याची माहिती आहे. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.
मेरठमध्ये प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने आयुष्य का संपवलं? (Meerut Social influencer Nisha Chauhan case)
या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेला त्यांचा मुलगाही या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला आहे. आरडाओरड झाल्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने निशाच्या घरी धाव घेतली. त्यावेळेस शेजाऱ्यांनी निशाला रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली असल्याचं पाहिलं. प्रदीप चौहानही यावेळेस गंभीर जखमी अवस्थेत आढळला. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेले. दरम्यान, डॉक्टरांनी तपासून निशाला मृत घोषित केले.
निशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, प्रदीपवर उपचार सुरू आहेत. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही हत्येची घटना 1,170 चौरस फूट जमिनीच्या नोंदणीवरुन झालेल्या वादातून घडली. त्याच दिवशी जमिनीचे रजिस्ट्रेशन होणार होते. जमिनीचे रजिस्ट्रेशन स्वत:च्या नावावर व्हावे अशी निशाची इच्छा होती. तर, प्रदीपला हे मान्य नव्हते. याच कारणामुळे दोघांमधील खटके उडाले, अशी माहिती आहे.
पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे. या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच पुरावे गोळा करुन तपासाला सुरुवात केली. या घटनेसंदर्भात मुलांची आणि शेजाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेरठच्या सरुरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.
निशा चौहान नेमकी कोण होती?
निशा चौहान ही मेरठमधील प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसर होती. इन्स्टाग्रामवर त्याचे 25 हजारहून अधिक फॉलोअर्स होते. ब्यूटी आणि लाइफस्टाइलच्या निगडीत कंटेट ती पोस्ट करत होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या: