17 Jun 2026 08:27 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : यास्तिका भाटीया आऊट, टीम इंडियाला चौथा झटका
नेदरलँडसने जोरदार कमबॅक केलं आहे. नेदरलँड्सने भारताला झटपट 3 झटके देत बॅकफुटवर टाकलं आहे. नेदरलँड्सने यास्तिका भाटीया हीला आऊट करत भारताला चौथा झटका दिला आहे. यास्तिकाने 3 धावा केल्या.
17 Jun 2026 08:21 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : भारताला तिसरा झटका, जेमीमाह रॉड्रिग्स आऊट
नेदरलँड्सने भारताला तिसरा झटका दिला आहे. जेमिमाह रॉड्रिग्स आऊट झाली आहे. जेमिमाहने 13 बॉलमध्ये 19 रन्स केल्या.
17 Jun 2026 08:20 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : भारताला मोठा झटका, स्मृती मंधाना आऊट
नेदलँड्सने भारताला दुसरा मोठा झटका दिला आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना आऊट झाली आहे. स्मृतीने 47 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. स्मृतीने या खेळीत 11 फोर आणि 1 सिक्स लगावला.
17 Jun 2026 08:09 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : शफालीनंतर उपकर्णधार स्मृती मंधानाचं अर्धशतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत
शफाली वर्मा हीच्यानंतर ओपनर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीने नेदरलँड्स विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. स्मृतीचं हे या स्पर्धेतील सलग आणि एकूण दुसरं अर्धशतक ठरलं आहे. स्मृतीने पाकिस्तान विरुद्धही अर्धशतक झळकावलं होतं.
17 Jun 2026 07:58 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : भारताला पहिला झटका, शफाली वर्मा आऊट
नेदरलँड्सने टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. शफाली वर्मा अर्धशतकानंतर आऊट झाली आहे. शफालीने 38 बॉलमध्ये 10 फोरसह 55 रन्स केल्या. हेदर सीगर्स हीने नेदरलँड्सला पहिलीवहिली विकेट मिळवून दिली.
17 Jun 2026 07:52 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : लेडी सेहवागची फिफ्टी, शफाली वर्माची कडक खेळी
लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीने नेदरलँड्स विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. शफालीने अवघ्या 34 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. शफालीचं हे वर्ल्डस कप स्पर्धेतील पहिलंच अर्धशतक ठरलं आहे. शफालीने या खेळीत 9 चौकार लगावले.
17 Jun 2026 07:33 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाच्या नावावर पावरप्ले, किती धावा केल्या?
स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने पावरप्ले आपल्या नावावर केला आहे. या दोघींनी पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 59 धावा केल्या आहेत. शफाली 26 आणि स्मृती 24 धावांवर नाबाद खेळत आहेत.
17 Jun 2026 07:13 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाची संयमी सुरुवात, शफाली-स्मृतीच्या किती धावा?
शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने टीम इंडियाला संयमी सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघींनी 3 ओव्हरमध्ये बिनबाद 26 धावा जोडल्या आहेत. स्मृती 13 आणि शफाली 15 धावांवर नाबाद खेळत आहेत.
17 Jun 2026 07:02 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : सामन्याला सुरुवात, भारताची बॅटिंग, शफाली-स्मृती मैदानात
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला सुरुवात झालीय. नेदरलँड्सने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून शफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
17 Jun 2026 06:43 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : नेदरलँड्स वुमन्स टीम प्लेइंग ईलेव्हन
नेदरलँड्स वुमन्स टीम प्लेइंग ईलेव्हन : हेदर सीजर्स, फेबे मोल्केनबोअर, बॅबेट डी लीडे (कर्णधार आणि विकेटकीपर), स्टेरे कॅलिस, रॉबिन रिजके, फ्रेडरिक ओव्हरडाइक, आयरिस झविलिंग, मिर्थे व्हॅन डेन रॅड, कॅरोलिन डी लँगे, सिल्व्हर सीजर्स आणि इसाबेल वोनिंग.
17 Jun 2026 06:43 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड आणि नंदनी शर्मा.
17 Jun 2026 06:39 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : नेदरलँड्सने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?
नेदरलँड्स वुमन्स टीमच्या बाजूने टॉसचा कॉल लागला आहे. नेदरलँड्सने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया 20 ओव्हरमध्ये किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
17 Jun 2026 06:36 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : नेदरलँड्स वुमन्स क्रिकेट टीम
नेदरलँड्स वुमन्स क्रिकेट टीम : बाबेट डी लीडे (कॅप्टन आणि विकेटकीपर), हेदर सीजर्स, फेबे मोल्केनबोअर, स्टेरे कॅलिस, रॉबिन रिजके, सान्या खुराना, फ्रेडरिक ओव्हरडीक, आयरिस झविलिंग, कॅरोलिन डी लँगे, सिल्व्हर सीजर्स, इसाबेल वोनिंग, मिर्थ व्हॅन डेन राड, लारा लीमहुइस, रोझाली लॉरेन्स आणि हन्ना लंधीर.
17 Jun 2026 06:34 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया
वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, श्रेयांका पाटील, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा, यास्तिका भाटिया, रेणुका सिंह ठाकूर, राधा यादव.
17 Jun 2026 06:30 PM (IST)
INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 17 जून रोजी 10 व्या सामन्यात भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.