भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यावर फारसे यश मिळाले नाही. टी20 मालिकेत पराभव झाल्यानंतर वर्ल्डकप स्पर्धेतही साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. पण लॉर्ड्सवर सुरू असलेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. या सामन्यात क्रांती गौडने भेदक गोलंदाजी केली. (Photo: BCCI Twitter)
क्रांती गौडने 17 षटकात 37 धावा देत 5 गडी बाद केले. यात 7 षटकं निर्धाव टाकली. तर इकोनॉमी रेट हा 2.20 प्रती षटक होता. माया बुशियर, टॅमी ब्यूमोंट, नॅट सायव्हर-ब्रंट, एलिस कॅप्सी आणि लॉरेन बेल यांना तंबूचा रस्ता दाखवला. (Photo: BCCI Twitter)
22 वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले. यासह क्रांती लॉर्ड्सवर कसोटी सामन्याच्या एका डावात पाच बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली. (Photo: BCCI Twitter)
कसोटीत पाच बळी घेणारी सर्वात तरुण भारतीय गोलंदाज ठरली. तिने झुलन गोस्वामीचा विक्रम मोडीत काढला. क्रांतीने ही कामगिरी अवघ्या 22 वर्षे आणि 333 दिवसांची असताना केली, तर झुलनने 2005 च्या दिल्ली कसोटीत इंग्लंडविरुद्ध वयाच्या 22 वर्षे आणि 361 दिवसांची असताना पहिले पाच बळी घेतले होते. (Photo: BCCI Twitter)
क्रांती गौडने लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली. इंग्लंडविरुद्धच्या भारतीय डावात कोणत्याही गोलंदाजाने ही कामगिरी यापूर्वी केली नव्हती. त्यामुळे हा विक्रम क्रांतीच्या नावावर नोंदवला गेला. (Photo: BCCI Twitter)




