singer s. janaki passes away
कला जगतातील दु:ख बातमीसमोर आली आहे. दक्षिण भारतातील ( nightingel ) गान कोकीळा समजली जाणारी प्रसिद्ध गायिका आणि दिग्गज पार्श्वगायिका एस. जानकी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाल आहे. त्यांना कला जगतात प्रेमाने जानकी अम्मा म्हटले जात होते. त्यांच्या निधनाने साऊथ सिनेमाच नव्हे तर भारतीय संगीत जगतात शोक लहर उमटली आहे. एस. जानकी यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सुरांची दैवी देणगी लाभलेल्या जानकी अम्मा यांनी यांच्या गायिकेसोबत त्या बिनधास्त आणि बेडधक वागणूकीसाठी देखील प्रसिद्ध होत्या. त्यांना साल २०१३ मध्ये देशातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्म भूषण’ जाहीर झाला, त्यावेळी त्यांनी तो स्वीकारण्यास साफ नकार दिला होता. त्यांचे म्हणणे होते की संगितात त्यांच्या योगदानाच्या हिशेबाने हा पुरस्कार त्यांना आधीच मिळायला हवा होता.
जेव्हा जानकी अम्मांनी पद्मभूषण नाकारला
साल २०१३ मध्ये, केंद्र सरकारने गायिका एस. जानकी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला तेव्हा मोठा वाद निर्माण झाला, कारण एस. जानकी यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. त्या स्पष्टपणे म्हणाल्या की भारतीय संगितातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा होता. पद्मभूषण पुरस्कार तर मला आधीच मिळायला हवा होता आणि या वयात पद्मभूषण स्वीकारणे अन्यायकारक आहे असेही जानकी यांनी सरकारला ठणकावले होते.
जानकी यांचा प्रवास
आपल्या प्रदीर्घ गायिकीच्या कारकिर्दीत जानकी अम्मा यांनी अनेक भाषात गाणी गायली होती. त्यांचा जादुई आवाज आणि प्रत्येक भाषेत गायकी करण्याची कला यामुळे एस. जानकी यांना चार वेळा प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इतकेच नव्हे तर, विविध राज्यांतील चित्रपट पुरस्कारांचा विचार केल्यास. त्यांना विक्रमी असे ३३ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले होते.
अनेक दिग्गज कलाकारांना साथ
हेमामालिनी, रेखा, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित या कलाकारांसाठी एस. जानकी यांनी ९० च्या दशकात हिंदी गाणी गायली होती. तसेच आर.डी.बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल. बाप्पी लाहिरी, अनु मल्लिक, रवींद्र जैन या संगितकारांसोबत काम केले होते. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरचा चित्रपटातील बटाटा वडा हे गाणे त्यांनी ठसक्यात गायिले होते.