India Squad For Afghanistan T20I : रिंकू सिंगसह 8 खेळाडू OUT! टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर; 15 जणांच्या संघात कोणाला मिळाली एन्ट्री? जाणून घ्या A टू Z


Team India squad for Afghanistan T20I series Announced : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 13 सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, बुमराहला मालिकेत खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करणे आवश्यक असणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर बुमराहने अद्याप कोणताही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या फिटनेसकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजू सॅमसनची पुन्हा संघात एन्ट्री

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी सर्वात लक्षवेधी बदलांपैकी एक म्हणजे संजू सॅमसनचे संघात झालेले पुनरागमन. झिम्बाब्वे दौऱ्यात टी-20 संघातून बाहेर राहिल्यानंतर आता सॅमसनला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले आहे. टी-20 विश्वचषकातील भारताच्या विजेतेपदाच्या मोहिमेत सॅमसनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी न झाल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात सॅमसनला पुन्हा संधी मिळाली. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने छाप पाडली. वैभवला या मालिकेत प्लेअर ऑफ द सीरीजचा पुरस्कारही मिळाला. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी हे दोघेही संघात असणार आहेत.

बुमराहसह चार खेळाडूंच्या फिटनेसवर निर्णय

भारतीय संघात चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला असला तरी त्यांच्या उपलब्धतेवर फिटनेस टेस्टचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. जसप्रीत बुमराह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान मिळाले आहे. मात्र, मालिकेपूर्वी या चौघांनाही फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना सामन्यात खेळण्याची परवानगी मिळेल. बुमराहने इंग्लंड दौऱ्यानंतर क्रिकेटपासून दूर राहिले आहे. हर्षित राणा आणि नीतीश कुमार रेड्डी हे देखील दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर होते. दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदरलाही दुखापतीमुळे श्रीलंका दौऱ्याला मुकावे लागले होते. त्यामुळे या चार खेळाडूंच्या फिटनेसची चाचणी भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

रिंकू सिंगसह 8 खेळाडू OUT

झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय टी-20 संघाचा भाग असलेल्या आठ खेळाडूंना अफगाणिस्तान मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. यामध्ये रिंकू सिंग, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रभसिमरन सिंह आणि हर्ष दुबे यांचा समावेश आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात यश ठाकूर आणि अशोक शर्मा यांनी भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, आता दोघांनाही संघाबाहेर करण्यात आले आहे. प्रिन्स यादवला झिम्बाब्वे दौऱ्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्याबाबतही फिटनेसचा मुद्दा होता. 
  
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ – 

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह*, अर्शदीप सिंह, हर्षित राणा*.

हे ही वाचा –

India squad for Afghanistan T20I series : संजूची पुन्हा संघात एन्ट्री, सूर्या बाहेरच! अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा धडाकेबाज संघ जाहीर, बुमराहचीही निवड, पण एका अटीवर





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *