Shubman Gill At Wimbledon With Sachin Tendulkar : भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल सध्या इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. 14 जुलैपासून भारत-इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. मात्र त्याआधी गिलने लंडनमधील प्रतिष्ठित विम्बल्डन टेनिस स्पर्धेला हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होते. तिघे एकत्र बसलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी पुन्हा एकदा शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या कथित नात्याची चर्चा सुरू केली.
शुभमन गिलने विम्बल्डनमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात एन्ट्री केली. फिकट तपकिरी रंगाचा ब्लेझर, निळा शर्ट, टाय आणि काळा गॉगल असा त्याचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. दुसरीकडे सचिन तेंडुलकर नेव्ही ब्लू सूटमध्ये तर अंजली तेंडुलकर ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसल्या. तिघांचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या.
फोटो व्हायरल झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या कथित नात्यावरून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी “आता तर नातं पक्कं झालं”, “सासरे-जावयाची जोडी भारी दिसते” अशा कमेंट्स केल्या. मात्र, शुभमन गिल किंवा सारा तेंडुलकर यांनी त्यांच्या नात्याबाबत आजपर्यंत कधीही अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सारा आणि शुभमनच्या नात्याची चर्चा नेहमीच रंगते
गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकरचं नाव वारंवार एकत्र जोडलं जात आहे. दोघे अनेकदा एकाच रेस्टॉरंटमध्ये किंवा एकाच ठिकाणी वेगवेगळ्या फोटोमध्ये दिसल्याने चाहत्यांनी विविध अंदाज बांधले. मात्र, या चर्चांवर दोघांनीही कधी शिक्कामोर्तब केलेले नाही किंवा त्यांचे खंडनही केलेले नाही. मैदानावरही अनेकदा प्रेक्षक शुभमनला “सारा… सारा…” अशा घोषणा देत चिडवताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या कथित नात्याची चर्चा कायम सोशल मीडियावर रंगत असते.
14 जुलैपासून भारत-इंग्लंड वनडे मालिकेला सुरुवात
दरम्यान, 14 जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. टी-20 मालिकेत भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याने आता वनडे मालिकेत दमदार पुनरागमन करण्याची संधी संघासमोर आहे. 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांसारखे अनुभवी खेळाडूही भारतीय संघासाठी मैदानात उतरणार आहेत.
हे ही वाचा –