Ind VS Eng 1st T20I Playing 11 : वैभव सूर्यवंशी IN, संजू नाही तर ‘हा’ खेळाडू OUT…; इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची खतरनाक Playing XI


India Playing 11 VS England 1st T20I : आयर्लंडविरुद्ध बेलफास्ट येथे झालेल्या टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना बुधवार (1 जुलै) रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड ग्राउंडवर खेळवला जाईल. आयर्लंडमधील खराब कामगिरीनंतर पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ आपल्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल करण्याची दाट शक्यता आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यात बेंचवर बसलेल्या अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची सुवर्णसंधी मिळू शकते.

संजू सॅमसन आणि इशान किशनचा खराब फॉर्म

हा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी संजू सॅमसनच्या जागी भारतासाठी डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. संजूने आयर्लंडविरुद्ध दोन्ही सामन्यांत सलामीवीर म्हणून निराशा केली. पहिल्या सामन्यात तो फक्त 5 धावांवर बाद झाला, तर रविवारी (28 जून) झालेल्या दुसऱ्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे ओपनर म्हणून सॅमसनचा पत्ता कट होणे जवळपास निश्चित आहे. मात्र, तो यष्टिरक्षक म्हणून संघात राहणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दुसरीकडे, इशान किशनची बॅटही या मालिकेत शांतच राहिली. त्याने पहिल्या सामन्यात 1 तर दुसऱ्या सामन्यात 11 चेंडूत केवळ 12 धावा केल्या. संघ व्यवस्थापनाला टॉप-3 मध्ये तीन डावखुरे फलंदाज खेळवणे टाळायचे आहे. अशा परिस्थितीत, वैभव सूर्यवंशीला संघात जागा देण्यासाठी संजू सॅमसनऐवीजी कदाचित इशान किशनलाच प्लेइंग XI मधून बाहेर बसावे लागू शकते. 

दरम्यान, जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज अभिषेक शर्माने आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात 20 चेंडूत 49 धावांची वादळी खेळी केली होती, त्यामुळे इंग्लंडविरुद्ध त्याचे स्थान निश्चित मानले जात आहे.

गोलंदाजी आणि अष्टपैलू संघात बदल होणार?

वेगवान गोलंदाजी विभागात बदल होण्याची शक्यता कमी आहे. परंतु, आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यांश शेडगेला संघात कायम ठेवले जाते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुंबईच्या या ऑलराउंडरला पहिल्या सामन्यात बॅट किंवा बॉलने कोणतीही विशेष चमक दाखवता आली नाही. जर शेडगेला प्लेइंग-11 मधून वगळले, तर वॉशिंग्टन सुंदरचे संघात पुनरागमन होऊ शकते.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग-11 (India Playing 11 VS England 1st T20I) : अभिषेक शर्मा वैभव सूर्यवंशी (पदार्पण), इशान किशन / संजू सॅमसन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

हे ही वाचा –

Shashank Singh News : मोठी बातमी : IPLचं मैदान गाजवणारा खेळाडू वादाच्या भोवऱ्यात; जेवण बनवणाऱ्यालाच चोपलं, 3 कलमांखाली थेट FIR दाखल, नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *