टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू संघाबाहेर; अनुभवी खेळाडूला संधी – Marathi News | India women vs england lords test pratika rawal ruled out priya punia replacement


भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. क्रिकेटचं मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाने गेल्या 142 वर्षांत पुरुष क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार राहिला आहे. मात्र, यंदाचा जुलै महिना महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. कारण लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिला कसोटी सामना खेळवला जाणार असून भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये 10 ते 13 जुलैदरम्यान हा ऐतिहासिक सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. एक स्टार खेळाडू या सामन्यातून बाहेर पडली आहे.

प्रतिका रावल संघाबाहेर

भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. संघातील स्टार फलंदाज प्रतिका रावल दुखापतीमुळे या ऐतिहासिक कसोटी सामन्यातून बाहेर पडली आहे. लॉर्ड्सवर खेळण्याचं तिचं स्वप्न भंगले आहे, हा भारतीय संघासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. तिच्या जागी अनुभवी फलंदाज प्रिया पुनिया हिची संघात निवड करण्यात आली आहे.

भारताचं पारडं जड

भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमधील कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं पारडं जड आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले गेले असून भारताने 3 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने केवळ एका सामन्यात विजय मिळवलेला आहे. उर्वरित 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघांमधील अखेरचा कसोटी सामना 2023 मध्ये झाला होता. त्या वेळी भारतीय संघाने इंग्लंडचा तब्बल 347 धावांनी पराभव केला होता.

भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), श्री चरणी, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), नंदिनी शर्मा, हरलीन देओल, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, सायली सातघरे आणि स्नेह राणा.

इंग्लंडचा संघ

नेट सिव्हर-ब्रंट (कर्णधार), टॅमी ब्यूमाँट, लॉरेन बेल, माया बाउचर, अ‍ॅलिस कॅप्सी, टिली कॉर्टीन-कोलमन, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फायलर, एमी जोन्स, हीदर नाइट, एम्मा लॅम्ब, ग्रेस पॉट्स, एली थ्रेलकेल्ड, मॅडी व्हिलियर्स आणि इस्सी वाँग.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *