ICC : कसोटीत चेंडूचा रंग बदलणार? टी-20 क्रिकेटमध्येही मोठा बदल पाहायला मिळणार? ICCची अहमदाबादला 30 मे च्या मीटिंगकडे सर्वांचं लक्ष


ICC News : पारंपरिक कसोटी सामन्यात लाल चेंडू तर दिवस-रात्र कसोटीत गुलाबी चेंडू वापरला जातो; मात्र एकाच कसोटी सामन्यात दोन्ही रंगांच्या चेंडूंचा वापर करण्याबाबत आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीत विचारविनिमय झाला आहे.

Hardik Pandya
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : सूर्यप्रकाशात पूर्णपणे होणाऱ्या कसोटीत लाल चेंडूचा वापर होतो, तर विद्युतझोतातील कसोटीत गुलाबी चेंडू वापरला जातो; मात्र एकाच कसोटीत दुरंगी चेंडूचा वापर करण्याचा विचार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मुख्य कार्यकारी समितीत झाला आहे. परिषदेच्या कार्यकारिणीत याबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. कार्यकारीणीची बैठक ३० मे रोजी अहमदाबादला आहे.

कसोटीत घटके पूर्ण करण्यासाठी काही वेळा विद्युतझोतात सामना खेळवला जातो. अपुरा प्रकाश असेल तर दोन्ही संघांच्या सहमतीने हा निर्णय होतो; मात्र विद्युतझोतात लाल चेंडूंचा सामना करणे अवघड होते. या परिस्थितीत त्या वेळी गुलाबी चेंडूंचा वापर करण्याचा प्रस्ताव असल्याचे वृत्त ‘क्रिकबझ’ या संकेतस्थळाने दिले आहे.
Maharashtra TimesMI vs RR : मुंबई इंडियन्सचा 30 धावांनी दारूण पराभव, राजस्थानची प्ले ऑफमध्ये थाटात एन्ट्री; पंजाब-केकेआर बाहेर
भिन्न रंगाच्या चेंडूंने थेट खेळ सुरू करण्यात काही प्रश्न येऊ शकतात. लाल चेंडू काही षटके जुना असू शकतो, त्या वेळी नवीन गुलाबी चेंडू कसा थेट दिला जाणार. त्याचबरोबर दोन्ही संघांना या नव्या चेंडूंशी जुळवून घेण्यातही प्रश्न येऊ शकतात; मात्र हा निर्णय दोन्ही संघांच्या सहमतीने होणार आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे.
Maharashtra TimesSara Tendulkar : लाखात एक नणंद! साराच्या पोस्टमध्ये युजरने सानिया वहिनीला वगळल्याने तिचा एकच शब्दात कडक रिप्लाय, लाईक्सचा पडला पाऊस
मुख्य प्रशिक्षकांना सामना सुरू असताना मैदानात येऊन मार्गदर्शन करण्यास मंजूरी देण्याबाबतही विचार सुरू आहे. याची अंमलबजावणी सुरुवातीस वन-डेमध्ये होईल. हे मार्गदर्शन प्रशिक्षक ड्रिंक ब्रेकच्या वेळी करू शकतील, असा प्रस्ताव आहे. मात्र, यात काही अडचणी आहे. ‘ब्रेकच्या वेळी येणाऱ्या प्रत्येकाने मैदानातील खेळाडूंसारखा पोशाख परिधान करणे बंधनकारक असल्याचे क्रिकेटचा नियम सांगतो, याकडे लक्ष वेधले जात आहे. वन-डेमध्ये प्रत्येक डावात दोन ड्रिंक ब्रेक असतात. टी-२० मध्ये यापूर्वीच ड्रिंक ब्रेकमध्ये प्रशिक्षकांना खेळाडूंसह चर्चा करण्याची मुभा देण्यात आली आहे.

हे तीन प्रस्ताव

  • टी-२० क्रिकेटमध्ये सध्या दोन डावांत २० मिनिटांचा ब्रेक असतो. ही वेळ १५ मिनिटांपर्यंत कमी करण्याची सूचना
  • सामन्याचा लांबणारा वेळ कमी करण्यासाठी हा प्रस्ताव आल्याचे काहींचे मत आहे.
  • गोलंदाजांच्या शैलीची वैधता तपासण्यासाठी मैदानावरील पंचांना ‘हॉकआय’ तंत्रज्ञानाची मदत देण्याचीही सूचना
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा