Horoscope Today 23 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 23 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत. आज बुधवारचा दिवस असल्याने हा दिवस भगवान विठ्ठलाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. विठुरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या…
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस अति उत्साह किंवा अति निराशा या दोन्ही गोष्टी आज टाळायला हव्यात, मुडी स्वभावाला आळा घालावा लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस महिलांना इच्छापूर्तीसाठी फार कष्ट घ्यावे लागतील, तुमचा थोडा संथपणा आणि आळशीपणा तुम्हाला नडेल
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस तुमच्या समोर योग्य संधी जरी आल्या तरी संशय आणि काम न करण्याची तयारी यामुळे हातात काही पडणार नाही काम करण्यात अडथळे येऊ शकतात
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस परिस्थितीशी झगडण्यात मोठी शक्ती खर्च होईल, व्यवसायात स्थैर्य परिश्रमानेच मिळेल
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस घरात आणि घराबाहेरही नवीन जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील, तरुणांना आवडत्या व्यक्ती भेटतील
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस महिलांचे अनेक गैरसमज होण्याची शक्यता आहे, जहालपणा टाळण्याकडे तुमचा कल राहील
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर टोकाला जाऊ नका आणि निराशही होऊ नका
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी दिशाभूल होण्याची शक्यता आहे, रोखीचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस धांदरटपणा केला तर नुकसान संपवते नोकरीमध्ये ज्या व्यक्तीवर काम सोपवले जाईल, ती व्यक्ती विश्वासार्ह आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस महिलांनी तब्येतीला जपावे, आज थोडी धडाडी ठेवली तर तुमची कामे होऊन जातील, त्यासाठी थोडे बळ एक वटायला हवे
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस इतरांशी वागताना थोडा अहंकाराचा भाग राहीलच, दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस जोडीदाराकडून बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण होतील, व्यवसायात उलाढाल बरीच कराल.
हेही वाचा :
Lord Ganesha: भगवान गणेशाच्या प्रिय 4 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! यंदा अनंत चतुर्दशी सुवर्णकाळ घेऊन येतेय, प्रगतीच्या नवीन संधी, पैसा, नोकरी, ज्योतिषशास्त्र…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)