Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..


Hindu Religion: हिंदू धर्मात देवघरात कलशावर नारळ ठेवण्याची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, हा कलश कुलदेवतेच्या नावाने ठेवला जातो. कलश आणि नारळ हे दोन्ही मंगल, समृद्धी आणि दैवी शक्तीचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे कोणतेही शुभकार्य, पूजा, गृहप्रवेश, विवाह, नवरात्र, सत्यनारायण पूजा किंवा धार्मिक विधी सुरू करण्यापूर्वी कलशस्थापना केली जाते. देवघरातील या नारळाची दररोज पूजा केली जाते. पण, अनेकदा या नारळाला कोंब येतो किंवा तडा जातो. अशा परिस्थितीत कोंब आलेल्या नारळांच काय करावं? नारळाला कोंब येणं, तडा जाणं शुभ की अशुभ? असे अनेक प्रश्न पडतात. त्यामुळे आज जाणून घेऊयात देवघरातील नारळाबाबत असं झाल्यावर काय करावं? शास्त्रात याबाबत काय म्हटलंय..

देवघरातील नारळाला कोंब येणे शुभ की अशुभ? शास्त्रात म्हटलंय..

धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यतांनुसार, देवघरातील नारळाला कोंब येणे हे शुभ संकेत मानले जाते. नारळाला श्रीफळ म्हटले जाते आणि तो देवी लक्ष्मी, शुभतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे कोंब फुटणे म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा, प्रगती, समृद्धी किंवा नवीन सुरुवातीचे प्रतीक असल्याची लोकमान्यता आहे. असं सांगितलं जातं की, देवघरातील नारळाला कोंब येणं म्हणजे देवाचा आशीर्वीद तुमच्यापाठी असल्याचा संकेत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या नारळाला कोंब आला तर घरात समृद्धी येते, कुटूंबातील सदस्यांच्या प्रगतीत वाढ होते. एकरदंच नारळाला कोंब येणं हे शुभ असून आर्थिक उन्नतीचे संकेत आहे.

कोंब आल्यावर काय करावं?

देवघरातील नारळाला कोंब आला असेल तर नारळाला मोकळ्या जागेवर तुम्ही लावू शकता. असे केल्याने रोपाची चांगली वाढ होईल.
शहरात मोकळी जागा किंवा शेतात लावणं शक्य नसेल तर बाल्कनीत लावता येईल.
बाल्कनीत नारळाचा कोंब लावण्यासाठी माती आणि शेणखत यांचा देखील समावेश करावा, जेणेकरून नारळाची चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होईल.

नारळाला तडा जाणे म्हणजे काय?

धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यतांनुसार, पूजेत ठेवलेल्या नारळाला नैसर्गिकरित्या तडा जाणे हे अशुभ असते, असा कोणताही स्पष्ट उल्लेख प्रमुख धर्मग्रंथ किंवा वास्तुशास्त्रात आढळत नाही. तापमान, आर्द्रता किंवा नारळ सुकल्यामुळेही तडे जाऊ शकतात. मात्र, काही लोकपरंपरांमध्ये तडा जाणे हा पूजेतील नारळ बदलण्याचा संकेत मानला जातो. अशा वेळी तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करणे किंवा झाडाखाली ठेवून नवीन नारळाची स्थापना करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे.

वास्तुशास्त्र काय सांगते?

वास्तुशास्त्रात देवघर स्वच्छ, सात्त्विक आणि व्यवस्थित ठेवण्यावर भर दिला जातो. त्यामुळे देवघरात ठेवलेला नारळ खराब होऊ लागला, बुरशी आली किंवा पूर्णपणे सुकून गेला असेल, तर तो योग्य विधीने विसर्जित करून नवीन नारळ ठेवणे योग्य मानले जाते.

शास्त्रीय कारण

शास्त्रीय कारण पाहता, पूजा करताना नारळ दीर्घकाळ राहिला तर नैसर्गिक बदल सुरू होतात. अनेकदा नारळाच्या कडक अशा आवरणातून कोंब येतो आणि अंकूर येण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे देवघरातील नारळाला कोंब येणं शुभ किंवा अशुभ नसून हे ऋतूचक्रावर अवलंबून आहे. असे शास्त्रीय कारण आहे.

नारळाला कोंब येणे किंवा तडा जाणे याबाबत वेगवेगळ्या समजुती..

धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यतांनुसार, देवघरात ठेवलेल्या नारळाला कोंब येणे किंवा तडा जाणे याबाबत वेगवेगळ्या समजुती प्रचलित आहेत. यांना सर्वमान्य शास्त्रीय नियम मानले जात नाहीत, तर त्या प्रामुख्याने लोकपरंपरा आणि श्रद्धांवर आधारित आहेत.

कोंब येणे: अनेकांच्या श्रद्धेनुसार शुभ आणि समृद्धीचे प्रतीक.
तडा जाणे: शास्त्रानुसार अशुभ असल्याचा ठोस आधार नाही; अनेकदा ते नैसर्गिक कारणांमुळे घडते.
अशा घटनांकडे अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धा आणि विवेकाने पाहणे अधिक योग्य मानले जाते.

हेही वाचा :

Shani Sade Sati: आता फक्त 1 च वर्ष कष्टाचं! एक ‘अशी’ रास, जिच्यावर 2027 पर्यंत शनि साडेसाती, ‘या’ गोष्टी सांभाळा, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *