ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत


Shah Rukh Khan Is Indias Most Valuable Celebrity: बॉलिवूडचा (Bollywood News) ‘किंग खान’ म्हणजेच, शाहरुख खान (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा सर्वाधिक ‘ब्रँड व्हॅल्यू’ (Brand Value) असलेला स्टार ठरलाय. दोन ब्लॉकबस्टर सिनेमे (Blockbuster Movie) आणि वाढत्या जाहिरात करारांमुळे (Endorsements) तो अव्वल स्थानावर पोहोचलाय. शाहरुख खान या यादीतला सर्वात मौल्यवाल सेलिब्रिटी (Indias Most Valuable Celebrity) बनलाय, तर ‘धुरंधर’ (Dhurandhar) रणवीर कपूर (Ranveer Kapoor) या यादीत दुसऱ्या स्थानी असून त्यानं किंग कोहलीलाही मागे टाकलंय. महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या वर्षी याच यादीत शाहरुख खान तिसऱ्या क्रमांकावर होता. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या अहवालात, विशेषतः पहिल्या तीन स्थानांच्या बाबतीत, लक्षणीय बदल दिसून आलेत. शाहरुख खान पहिल्या स्थानी आहे, तर रणवीर सिंह 162.9 मिलियन डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय आणि त्यानं विराट कोहलीला मागे टाकलंय. महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या वर्षी शाहरुख खान तिसऱ्या स्थानावर होता. 

 

 

View this post on Instagram

 

विराट कोहलीला मागे टाकून रणवीर सिंह दुसऱ्या स्थानी (Virat Kohli Vs Ranveer Singh)

एकाच वर्षात ‘जवान’ आणि ‘पठाण’ यांसारख्या दोन मोठ्या सिनेमांच्या यशानंतर जाहिरात क्षेत्रात किंग खानची मागणी वाढली आहे. त्याच्या ब्रँड एंडोर्समेंट्सची संख्या 28 वरून 36 वर पोहोचलीय. दुसऱ्या स्थानाचा विचार केला तर, ‘धुरंधर’ फ्रँचायझीच्या प्रचंड यशानंतर रणवीर सिंहच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झालीय. दरम्यान, गेल्या वर्षी अव्वल स्थानी असलेला विराट कोहली आता 158.4 मिलियन डॉलर्सच्या मूल्यांकनासह तिसऱ्या स्थानावर आहे.

सहाव्या स्थानावर आलिया भट आणि दीपिका सातव्या स्थानावर… (Alia Bhat vs Deepika Padukone)

काही क्रिकेटपटूंनंतर, 93.9 मिलियन डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह आलिया भट्ट सहाव्या स्थानावर आहे. 89.2 मिलियन डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह दीपिका पदुकोण सातव्या स्थानावर आहे, तर 99.9 मिलियन डॉलर्ससह हृतिक रोशन आठव्या स्थानावर आहे. अमिताभ बच्चन नवव्या स्थानावर आहेत आणि अक्षय कुमार दहाव्या स्थानावर आहेत; अमिताभ यांची ब्रँड व्हॅल्यू 80.8 मिलियन डॉलर्स आहे, तर अक्षय कुमार याचे मूल्य 80 मिलियन डॉलर्स आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, ‘हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय…’





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *