Hemant Dhome: अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग ही जोडी कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. वर्षाच्या सुरुवातीलाच हेमंतच्या ‘ क्रांतीज्योती विद्यालय :मराठी माध्यम ‘ चित्रपटामुळे धमाकेदार सुरुवात केली. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. शिवाय, सोशल मीडियावरून अनेक राजकीय, सामाजिक घडामोडींवर भाष्य करतानाही तो दिसतो. सध्या हेमंतने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची सगळीकडे चर्चा आहे. ढोमे परिवारात गौराईचा आगमन झालं असं कॅप्शन लिहीत त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. मुक्ता बर्वेसह स्पृहा जोशी, निवेदिता सराफ यांनी भरभरून आनंद व्यक्त केलाय. ही गौराई नेमकी कोण ? जाणून घेऊया..
ढोमे परिवारात गौराईचं आगमन!
हेमंत ढोमेने सोशल मीडियावर एक गोड वासराचा फोटो शेअर केलाय. त्यावर त्याने एक खास पोस्ट लिहिलीय. हेमंत म्हणाला, ”ढोमे परिवारात गौराईचं आगमन! आमच्या प्रिय लक्ष्मीने शुभ्र चांदणी सारख्या गौरीला जन्म दिला, आणि घरात भरभराट आणली! प्रचंड आनंदाचा क्षण!”. हेमंतच्या घरी असलेल्या लक्ष्मी नावाच्या गाईने गोंडस वासराला जन्म दिलाय. तिचं नाव त्याने ‘गौरी’ असं ठेवलंय. त्यामुळे ढोमे परिवारात सध्या आनंदाचं वातावरण आहे. हेमंतसह क्षिती आणि त्यांच्या घरातील सगळेच सदस्य लक्ष्मी आणि गौरीचे लाड करताना दिसत आहेत. दोघींच्या जवळ बसून त्यांना चारा खाऊ घालताना दिसतायत.
View this post on Instagram
हेमंतच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी त्यांचे प्रेम व्यक्त केलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशींनी ‘निष्पाप ‘ असं म्हटलंय. तर मुक्ता बर्वेने ‘गौरी कसली गोड आहे ‘ असं म्हणत हेमंतच्या घरातील नव्या सदस्याचा स्वागत केलं. वासराचे लाड करताना हेमंत क्षितीच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
आणखी वाचा