Health: मंडळींनो..खांद्याच्या दुखापतीची 5 सुरुवातीची लक्षणं, दुर्लक्ष करणं महागात पडेल, कमी लोकांना माहित, तज्ज्ञ सांगतात…


Health: आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यापैकी खांद्यातील वेदना अनेकदा साधा स्नायूंमधील ताण समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वेळेवर उपचार न घेतल्यास या समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात आणि त्याचा दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो. याबाबत डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई येथील वरिष्ठ सल्लागार ऑर्थोपेडिक्स, शोल्डर सर्जरी, आर्थ्रोस्कोपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन डॉ. आदित्य साई यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

‘या’ कारणांमुळे होते खांद्याची दुखापत…(Do not ignore 5 symptoms of a shoulder injury)

तज्ज्ञ सांगतात, जड वजन चुकीच्या पध्दतीने उचलणे, चुकीच्या पद्धतीने बॅग पाठीवर घालणे , अचानक झटका बसेल अशी कृती करणे, खेळातील दुखापती, सतत मोबाईल व संगणकाचा वापर, बसण्याची चुकीची पद्धत, जिममधील ताण किंवा प्रवासामुळे खांद्यावर ताण येऊ शकतो. यामुळे रोटेटर कफ टिअर, टेंडोनायटिस, फ्रोजन शोल्डर, लिगामेंट दुखापत, डिसलोकेशन आणि स्नायू ताण यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका (Health News)

सतत खांदा दुखणे : काही दिवस सतत वेदना होणे हे काही सामान्य नाही. सततची वेदना ही टेंडनला सूज, स्नायू किंवा लिगामेंट दुखापतीचे लक्षण असू शकते.

हात वर उचलताना त्रास होणे : डोक्याच्या वर हात उचलताना वेदना होणे किंवा अडचण येणे ही रोटेटर कफ दुखापत किंवा शोल्डर इम्पिंजमेंटचा संकेत असू शकतो. अशावेळी केस विंचरणे, कपडे घालणे किंवा वस्तू उचलणे देखील कठीण होऊ शकते.

खांद्यामध्ये कमजोरी जाणवणे : जड वस्तू उचलताना किंवा खांद्यावरील जड बॅगमुळे खांद्यमध्ये कमजोरी जाणवत असल्यास स्नायू किंवा स्नायुबंधाचे नुकसान झालेले असू शकते.

सूज किंवा क्लिकिंग आवाज येणे : खांद्याभोवती सूज येणे तसेच हालचालीदरम्यान खटखट किंवा क्लिकिंग आवाज येणे हे सांधा अस्थिर होणे, लिगामेंट दुखापत किंवा कार्टिलेजच्या नुकसानाचे लक्षण असू शकते.

झोपताना वेदना वाढणे रात्री झोपताना किंवा एका बाजूला झोपल्यावर वेदना वाढत असल्यास ते खांद्यातील सूज किंवा रोटेटर कफ सारख्या समस्येचे संकेत असू शकतात.

वेळीच उपचार गरजेचे

तज्ज्ञ सांगतात, उपचार न घेतल्यास खांद्याची हालचाल मंदावणे, फ्रोजन शोल्डर, स्नायुंमध्ये तीव्र वेदना तसेच दीर्घकाळ पुनर्वसनाची गरज भासू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात विश्रांती, बर्फाने शेकणे, वेदनाशामक औषधे, फिजिओथेरपी आणि योग्य शारीरीक स्थिती यांचा फायदा होतो. मात्र, गंभीर स्नायू किंवा लिगामेंट दुखापतींमध्ये आर्थ्रोस्कोपिक रोटेटर कफ रिपेअर किंवा शोल्डर स्टॅबिलायझेशन शस्त्रक्रिया आवश्यक ठरू शकते.तज्ज्ञांच्या मते, खांद्यातील वेदना दीर्घकाळ टिकत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा

एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं? 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *