Guru Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, माणसाच्या चांगल्या-वाईट दिवसांमागे ग्रहांची शुभ-अशुभ स्थिती कारणीभूत ठरते. आणि आज तब्बल 12 वर्षांनी असाच एक योगायोग बनत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्वात शुभ आणि भाग्यदाता मानला जाणारा गुरू ग्रह आज एक अशी हालचाल करणार आहे, जी 2026 या वर्षातील सर्वात मोठी ज्योतिषीय घटना ठरेल. याचा देश आणि जगासह सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडतील. मात्र 5 राशी अशा आहेत, ज्यांचं नशीब आता चांगलंच फळफळणार आहे, जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल….
12 वर्षांनंतर गुरूचे ‘महासंक्रमण’: 5 राशींचं भाग्य फळफळणार…(Guru Transit 2026)
ज्योतिषशास्त्रानुसार, 2 जून रोजी गुरू वृषभ राशी सोडून आपल्या उच्च राशी, कर्क राशीत प्रवेश करतोय. गुरूचा कर्क राशीत प्रवेश ही एक सामान्य घटना नाही. गुरू एका राशीत अंदाजे 12 महिने राहतो, म्हणजेच हे ‘महासंक्रमण’ तब्बल 12 वर्षांनंतर होणार आहे. गुरूच्या कर्क राशीतील प्रवेशामुळे देश आणि जगासह सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडतील.
गुरूचे सर्वात शक्तिशाली आणि सकारात्मक रूप…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाला ज्ञान, संतती, संपत्ती, विवाह, दीर्घायुष्य, धर्म आणि भाग्याचा घटक मानले जाते. कर्क राशीचा स्वामी असलेला चंद्र हा गुरूचा सर्वात चांगला मित्र आहे. जेव्हा गुरू कर्क राशीत असतो, तेव्हा तो त्याच्या सर्वात शक्तिशाली आणि सकारात्मक रूपात असतो, ज्याला ‘उच्चस्थ गुरू’ म्हणून ओळखले जाते. हे गोचर पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा आणेल. ज्यांना विवाहात विलंब, करिअरमध्ये अडथळा किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासाठी आता चांगले दिवस येतील.
गुरूचं महासंक्रमण, 4 राशींचे चांगले दिवस…
गुरुचे हे गोचर सर्वांसाठी महत्त्वाचे असले तरी, अशा चार राशी आहेत ज्यांना पुढील वर्षात प्रचंड यश मिळू शकते:
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचे महासंक्रमण तुमच्या कौटुंबिक सुखात लक्षणीय वाढ होईल. नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्याची शक्यता आहे. तुमच्या आईचे आरोग्य सुधारेल. तुमच्या करिअरमध्ये मान आणि सन्मान वाढेल आणि तुम्हाला मनःशांती मिळेल.
कर्क (Cancer)
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचे महासंक्रमण तुमच्यासाठी “हंस पंचमहापुरुष राजयोग” तयार होईल. परिणाम: हा काळ तुमच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल, तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि तुमची निर्णयक्षमता मजबूत होईल. आरोग्य सुधारेल आणि वैवाहिक सुख वाढेल. समाजात आदर वाढेल, जुनाट आजार बरे होतील आणि प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी उत्तम संधी मिळतील.
कन्या (Virgo)
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु महासंक्रमणामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील आणि दीर्घकाळापासूनच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांकडून आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही व्यवसायात असाल, तर एक मोठा करार निश्चित होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ निश्चितपणे मिळेल. तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु महासंक्रमणामुळे तुमचे सुप्त भाग्य जागृत होईल. प्रत्येक प्रयत्नात भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. दूरचा प्रवास आणि तीर्थयात्रा होण्याची दाट शक्यता आहे. जे प्रकल्प पूर्वी नशिबावर सोडले होते, ते पूर्ण होतील. दूरचा प्रवास किंवा परदेश प्रवासाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात मोठे यश मिळेल.
मीन (Pisces)
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु महासंक्रमण तुमच्यासाठी एक अद्भुत काळ असेल; ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि तुमची सर्जनशीलता शिगेला पोहोचेल. जर तुम्ही संततीसाठी प्रयत्न करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ (शेअर बाजार, लॉटरी किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून) मिळण्याची दाट शक्यता आहे.
‘या’ राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक..
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु, मकर आणि मिथुन राशीच्या लोकांनी या काळात आपले आरोग्य आणि खर्च नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. गुरुच्या या भ्रमणादरम्यान पैशांची हुशारीने गुंतवणूक करा आणि कोणालाही मोठी रक्कम उधार देणे टाळा.
गुरुला प्रसन्न करण्याचे आणि आपले भाग्य सुधारण्याचे 5 उपाय
- जर तुमच्या कुंडलीत गुरु कमजोर असेल किंवा अशुभ परिणाम देत असेल, तर 2 जूनपासून पुढील एक वर्षासाठी हे उपाय करा.
- गुरुवारचा उपवास: प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा करा. शुद्ध तुपाचा दिवा लावा.
- पिवळ्या वस्तूंचे दान: दर गुरुवारी एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला हरभरा डाळ, केळी, हळद किंवा पिवळे कपडे दान करा.
- कपाळावर टिळा: दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर आपल्या कपाळावर केशराचा किंवा हळदीचा टिळा लावा.
- वडिलाधमांचा आदर करा: वडीलधाऱ्या व्यक्ती, आई-वडिला आणि कुटुंबाचा आदर करा.
हेही वाचा
Sankashti Chaturthi 2026: 3 जूनची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल! बाप्पांच्या कृपेने 4 राशींच्या आयुष्याचं सोनं, अडीच वर्षांनी दुर्मिळ योगायोग, चंद्रोदय, तिथी…
(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
आणखी वाचा