Garud Puran: निसर्गाचा नियमच आहे की, जो जन्माला येतो, त्याला मृत्यूलाही सामोरे जावे लागते. हिंदू धर्मानुसार, जन्म आणि मृत्यू हे एक असे चक्र आहे, जो कोणी या जगात प्रवेश करतो, त्याला एक दिवस आपले शरीर सोडावेच लागते. पण मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर हिंदू धर्मातील महान शास्त्र गरुड पुराण या बाबतीत रहस्य उलगडते. असं म्हणतात की मृत्यूनंतर आत्मा यमलोकाचा प्रवास सुरू करतो. पण यमलोकाला असे 4 दरवाजे आहेत. जिथून कोण स्वर्गात जाणार? आणि कोण नरकात जाणार? याबाबतीत प्रवास सुरू होतो. गरूड पुराणानुसार, आज आपण जाणून घेऊया, यमलोकाच्या त्या चार दरवाजांबद्दल… जिथे कोणता मार्ग पुण्यवान आत्म्यांना स्वर्गात तसेच पापी जीवांना नरकात घेऊन जातो…
यमलोकाचे ते 4 दरवाजे कोणते? कोणता दरवाजा स्वर्गाकडे घेऊन जातो…(Garud Puran)
गरुड पुराणानुसार, या 4 दिशांमधील दरवाजांवर आत्म्याच्या शुद्धीकरणाची आणि त्याच्या पुण्याईची परीक्षा घेतली जाते. पूर्वेकडील दरवाजा योगी आणि सिद्धांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. हा दरवाजा अत्यंत मनमोहक आणि अलौकिक आहे. येथे हिरे, नीलम आणि पुष्कराज यांसारखी मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. ज्या जीवांनी आपले जीवन योग, ध्यान आणि ईश्वरभक्तीसाठी समर्पित केले आहे, त्यांच्यासाठी हा दरवाजा उघडतो. या दरवाजावर देव आणि गंधर्वांकडून आत्म्याचे भव्य स्वागत केले जाते.
दयाळू, सत्याचे पालन करणाऱ्यांसाठी कोणता दरवाजा?
गरुड पुराणानुसार, हा दरवाजा देखील सोने आणि रत्नांनी सुशोभित केलेला आहे. उत्तरेकडील दरवाजा अशा जीवांना प्रवेश देतो, ज्यांनी निस्वार्थपणे आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे, नेहमी सत्याचे पालन केले आहे आणि अहिंसेच्या मार्गाचे अनुसरण केले आहे. परोपकारी आणि दयाळू जीव या मार्गातून जातात.
सदैव गरजूंना दान, धार्मिक लोकांचा मार्ग कोणता?
गरुड पुराणानुसार, पश्चिमेकडील द्वार त्यांच्यासाठी राखीव आहे ज्यांनी आपल्या हयातीत दानधर्माला प्राधान्य दिले आणि धर्माच्या नियमांचे पालन केले. जे तीर्थयात्रा करतात आणि ज्यांचे विचार शुद्ध असतात, त्यांना या मार्गातून एक सुखद अनुभव येतो.
नरकाचे प्रवेशद्वार…
गरुड पुराणातील दक्षिणेकडील द्वाराचे वर्णन अंगावर काटा आणणारे आहे. याला नरकाचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. हे द्वार अशा लोकांसाठी उघडते ज्यांनी आयुष्यभर अधार्मिक कृत्ये, हिंसा, चोरी केली आहे आणि इतरांना दुःख दिले आहे. येथील मार्ग काटे, भाजून काढणारी आग आणि भयंकर अंधाराने भरलेला आहे. पापी जीवांना यमदूतांद्वारे येथून ओढले जाते, जिथे त्यांना त्यांच्या कर्मांची भयंकर शिक्षा भोगावी लागते.
हेही वाचा
Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसू नये! तुमच्या राशीनुसार सौभाग्यासाठी कोणते रंग शुभ? धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व जाणून घ्या…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report