Alka Yagnik Emotional Post After Padma Bhushan 2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी 23 जून रोजी दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांना पद्म पुरस्कार (Padma Awards) प्रदान केले. संगीत क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाबाबत गायिका अलका याज्ञिक (Singer Alka Yagnik) यांना ‘पद्म भूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अलका याज्ञिक पुरस्कार स्विकारण्यासाठी ज्यावेळी जागेवरुन उठल्या, त्यावेळी त्यांना पुरस्कार स्विकारण्यासाठी जाताना दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Singer Alka Yagnik Viral Video) झाला. या फोटोमध्ये अलका याज्ञिक यांची प्रकृती खालावलेली दिसले. त्यामुळे चाहत्यांची चिंता भलतीच वाढली. अशातच आता पद्म पुरस्कार स्वीकारल्यानंतर, अलका याज्ञिक यांनी सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केलीय.
मंगळवारी, 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी बॉलिवूडच्या गायिका (Bollywood Singer) अलका याज्ञिक यांना ‘पद्म भूषण’ देऊन सन्मानित केलं. हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर जाताना 60 वर्षीय गायिका एका सहाय्यकाची मदत घेताना दिसल्या. तसेच त्या शारीरिकदृष्ट्या अशक्त वाटत होत्या. या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केलीय.
संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी एक पोस्ट अलका याज्ञिक यांनी सोशल मीडियावर शेअर केलीय. यासोबतच, त्यांनी सध्या ज्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत आहेत, त्याबद्दलही भाष्य केलंय.
पोस्टमध्ये अलका याज्ञिक यांनी आजारपणाबाबत सांगितलं
पद्म पुरस्कार स्विकारल्यानंतर अलका याज्ञिक यांनी गेल्या दोन वर्षांत उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्यांबाबत सांगितलं. आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “गेल्या दोन वर्षांपासून मी प्रसिद्धी झोतातून आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिलेय, तसेच माझ्या आयुष्यातील प्रवासाबाबत फारशी माहिती शेअर केलेली नाही. माझ्या आरोग्याशी संबंधित आव्हानांचा मी सामना करत होते, हे तुमच्यापैकी अनेकांना माहीत होते… आणि या संपूर्ण काळात तुमचं प्रेम, प्रार्थना, संदेश आणि खंबीर पाठिंबा मला प्रत्येक टप्प्यावर मिळालाय…”
अलका याज्ञिक यांनी मानले आभार
अलका याज्ञिक यांनी पुढे बोलताना लिहिलंय की, “आज, जेव्हा मी देशातला सर्वात मोठा नागरिक सन्मानांपैकी एक असलेला पद्म भूषण पुरस्कार घेण्यासाठी पुढे आली, तेव्हा माझं मन कृतज्ञतेनं भरलेलं होतं. या सन्मानामुळे मला अत्यंत नम्रतेची जाणीव होतेय, जरी यावर माझं नाव असलं, तरी तो तितकाच माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व श्रोत्यांचाही आहे, ज्यांनी माझ्या आवाजाला आपल्या आयुष्यात स्थान दिलंय, माझी गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवलीत आणि सुख-दुःखाच्या सर्व प्रसंगांत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेत…”
“हळू हूळ कमबॅक करतेय…”
अलका याज्ञिक लिहिलंय की, “हा क्षण माझ्या आयुष्यातल्या सर्व क्षणांपैकी सर्वात खास आहे, कारण ही केवळ माझ्या कामाची दखल नाही, तर प्रेम, आशा आणि धैर्यापासून मिळणाऱ्या बळाचीही ती एक आठवण आहे. मी हळूहळू सावरत आहे आणि मला आज इथे उपस्थित राहायचं होतं, केवळ माझ्यासाठीच नाही, तर या प्रवासाचा भाग असलेल्या तुम्हा सर्वांसाठी…”
अलका याज्ञिक पुढे बोलताना म्हणाली की, “या विशेष सन्मानाबद्दल मी भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारत सरकार यांची मनापासून कृतज्ञ आहे. मी अत्यंत नम्रतेनं आणि आदरानं हा सन्मान स्वीकारते. गेल्या अनेक वर्षांत तुम्ही माझ्यावर जे प्रेम आणि स्नेह दर्शवला आहे, माझ्यासाठी प्रार्थना केल्या आहेत आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी आपली आभारी आहे, या सर्व गोष्टी माझ्यासाठी अत्यंत मोलाच्या आहेत. आज मला केवळ एक पुरस्कारच मिळाला नाही, तर माझ्या प्रवासाचा भाग असलेल्या लाखो लोकांचं प्रेमही मला अनुभवता आलंय. अगदी मनापासून धन्यवाद, अलका…”
अलका याज्ञिक यांना नेमकं झालंय काय?
अलका याज्ञिक व्हायरल अटॅकमुळे ‘सेंसरीन्यूरल हियरिंग लॉस’ (ऐकण्याची क्षमता कमी होणं…) यांसारख्या समस्यांशी झुंजतेय. याबाबत त्यांनी पहिल्यांदाच 2024 मध्ये जाहीरपणे सांगितलेलं. काही महिन्यांपूर्वी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलेलं की, त्या अजूनही पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीत आणि त्यांना अजूनही शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यांच्या या आजारपणामुळे त्यांच्या कामकाजावरही परिणाम झालाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष