खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला हत्या प्रकरणात अटक होणार? विलास घुले प्रकरणात सोनवणे यांचा मोठा खुलासा.. – Marathi News | MP Bajrang Sonawane made significant statement regarding the Vilas Ghule case


बीडच्या केसमध्ये हॉटेल मालक विलास घुले यांची हत्या झाली. भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार झाले. या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आले. नातेवाईकांनी मुख्य सूत्रधार असलेल्या साैरभ बजरंग सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराविरोधात गुन्हा दाखल केला जात नव्हता, यासोबतच आरोपींना हत्येच्या व्हायरल व्हिडीओनंतरही अटक केली जात नसल्याने नातेवाईकांनी विलास घुले याचा मृतदेह थेट 11 तास केज पोलिस ठाण्यासमोर ठेवला. अखेर जवाबात साैरभ बजरंग सोनवणे याच्या नावाचा पोलिसांनी उल्लेख केला, त्यानंतर विलास घुले याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आली. या प्रकरणात गंभीर आरोपी केली जात आहेत.

मुलावर थेट हत्येचा आरोप होत असतानाच आता खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठे विधान केले. बजरंग सोनवणे यांनी म्हटले की, मी मागच्या तीन दिवसांपासून हेच सांगतो की, टाकळी फाट्यावर जी घटना घडली. ती घटना दुर्देवी आहे. ती घटना कशामुळे घडली, का घडली? याच्या खोलात गेले पाहिजे. मुळात भांडणे का झाले? विनाकारण कोण कोणाला मारायला येते, घुले भांडण सोडवायले गेला.

हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने झाला आहे. या प्रकरणात माझ्या मुलाचे नाव पुढे येत आहे आणि हे जाणीपूर्वक राजकारण आहे. कुटुंबियांना वाटतंय.. कुटुंबियांनी करावे.. त्याबाबत माझे काही म्हणणे नाही. पण आमच्या इथे जे किड लागलेले राजकारण करत आहेत.. इथे बसून राजकारणी मंडळी चेतावत आहेत. चेतावणी दिल्याने हे वेगळ्या पद्धतीने होत आहे. मी पोलिस यंत्रणेला मदत करणार, पोलिस यंत्रणेला जी काही मदत लागेल ती मी करेल.

मी, माझा मुलगा आणि माझे कुटुंबिय पोलिस यंत्रणेला हवी ती मदत करण्यास तयार असल्याचे बजरंग सोनवणे यांनी म्हटले. यादरम्यान या प्रकरणावर बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले की, तपास योग्य दिशेने सुरू आहे. बजरंग सोनवणे चाैकशीला सामोरे जाण्याला तयार आहेत. जो तो आपल्या पद्धतीने राजकारण करतो, असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणात सुरेश धस यांनीही सावध भूमिका घेतली. सुरेश धस यांनी म्हटले की, विलासच्या प्रकरणाचे कोणीही समर्थन केले नाही, विलासला न्याय हा मिळालाच पाहिजे, दोष असेल तर सोनवणेंवर कारवाई होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *