Ganesh Shinde : कार्यक्रमावरून घरी येताना लोकप्रिय गायकांचा अपघात; एकाला दुखापत, दोघींवर शस्त्रक्रिया; पोस्ट करत दिली माहिती


Singer Ganesh Shinde Accident : सुप्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी माहिती दिली आहे.

Singer Ganesh Shinde Car Accident
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला असून वेळीच गाडीतील एअरबॅग्स उघडल्यानं मोठा अनर्थ टळला. गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली असून गायिका सन्मिता शिंदे आणि प्रतिक्षा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघींवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली असून गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

गणेश शिंदे यांची पोस्ट

गणेश शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘कानावरून गेलं…“मोगरा फुलला” कार्यक्रम आटपून घरी परतत असताना आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स ओपन झाल्यानं मोठा अनर्थ टळला. मला एअरबॅग्समुळे छातीला दुखापत झाली असली तरी ती ऑपरेशनशिवाय बरी होण्यासारखी आहे. सन्मिता आणि गायिका प्रतिक्षा यांच्या पायाला दुखापत झाली. मित्रपरिवार, ॲम्ब्युलन्स सेवा आणि माऊली हॉस्पिटल तसेच संचेती हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तातडीनं मदत केल्यामुळे सर्व उपचार वेळेत सुरू झाले.’
Maharashtra TimesRakhi Sawant : ‘आईच्या दबावामुळे चुकीच्या माणसासोबत लग्न केलं, त्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला’ राखी सावंतचा दावा
‘प्रतिक्षाचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं असून सन्मिताचेही ऑपरेशन आता व्यवस्थित पार पडेल. ओटीमध्ये जाताना तिला ज्ञानोबरायांचा फोटो दाखवला मोबाईलमध्ये. म्हटलं तू आता बरी होशील आणि माऊलीसमोर अभंग म्हणशील. इवलेसे रोप लावियेले द्वारी…या संपूर्ण प्रसंगात अनेक प्रश्न मनात येतात, पण शेवटी जाणवतं, अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढे अधिक काळजी घ्यायची आणि बाकी सर्व माउलींच्या चरणी स्वाधीन करायचं.’
‘आपल्या सर्व रसिकश्रोत्यांचे, मित्रपरिवाराचे, शुभेच्छा व आशीर्वाद आहेतच. अनेक मित्रांनी मान्यवरांनी मनापासून सहकार्य केलं व तातडीनं मदत उपलब्ध झाली आभारी आहोत. ज्ञानोबारायांची कृपा आणि आपला आशीर्वाद कायम सोबत राहो. तुकोबारायांच्या शब्दांत एवढंच —“कृपाळू सज्जन,तुम्ही संतजन…परी पायावेगळा करू नका…” असं गणेश यांनी शेवटी म्हटलं आहे.
Maharashtra TimesMegha Ghadge : लावणीच्या नावाखाली आयटम सॉन्ग करणाऱ्या मुलींना मार खाण्यापासून वाचवलं, त्यांनीच दारू ऑफर केली; मेघा घाडगेनं सांगितला प्रसंग
दरम्यान, ‘मोगरा फुलला’ आणि ‘ज्ञानियांचा राजा’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे गणेश शिंदे आणि त्यांची टीम रसिकांमध्ये लोकप्रिय असून संत साहित्यावर आधारित गाणी आणि व्याख्यानांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा