Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत 9 पैकी 4 जण गैरहजर; मातोश्रीवर कोण-कोण पोहोचले?, संपूर्ण यादी


Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज रविवारी (14 जून) मुंबईतील ‘मातोश्री’ (Matoshree) निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता पक्षाच्या सर्व लोकसभा खासदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) जोरदार चर्चा सुरू असताना, या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आता या बैठकीला कोणते खासदार प्रत्यक्षात हजर राहिले, कोण ऑनलाईन जोडले गेले आणि कोण गैरहजर राहिले, याची सविस्तर माहिती समोर आली आहे.

Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित असलेले खासदार

‘मातोश्री’वर प्रत्यक्ष उपस्थित राहून पक्षप्रमुखांच्या बैठकीला हजेरी लावलेले खासदार खालीलप्रमाणे: 

1. अरविंद सावंत (खासदार, दक्षिण मुंबई)
2. अनिल देसाई (खासदार, दक्षिण मध्य मुंबई)
3. राजाभाऊ वाजे (खासदार, नाशिक)

Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: ऑनलाईन (Online) हजेरी लावलेले खासदार

काही अपरिहार्य कारणांमुळे मुंबईत येऊ न शकलेल्या दोन खासदारांनी तंत्रज्ञानाचा वापर करत या बैठकीला डिजिटल पद्धतीने हजेरी लावली. 

संजय देशमुख (खासदार, यवतमाळ): पुढच्या महिन्यात मुलीचे लग्न असल्याने ते मुंबईला येऊ शकले नाहीत, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली.

नागेश पाटील-आष्टीकर (खासदार, हिंगोली): सध्या विधान परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने ते मतदारसंघात व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांनीही ऑनलाईन हजेरी नोंदवली.

Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: बैठकीला गैरहजर राहिलेले खासदार आणि त्यांची कारणे

1 खासदार भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) – ‘नॉट रिचेबल’!

बैठकीत सर्वाधिक चर्चा रंगली ती शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची. वाकचौरे हे सकाळपासून ‘नॉट रिचेबल’ आहेत. ते गेल्या दोन दिवसांपासून आपल्या कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले असून, त्यांचे स्वीय सहाय्यक देखील सोबत नाहीत. त्यांच्या या गूढ गैरहजेरीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

२. खासदार ओमराजे निंबाळकर (धाराशिव) – मुलाची प्रकृती अस्वस्थ

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर या बैठकीला ऑफलाइन किंवा ऑनलाईन अशा कोणत्याही पद्धतीने उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यांच्या मुलाची तब्येत बिघडल्याने त्याला पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ओमराजे पुण्यात असून, त्यांनी याबाबतचा निरोप पक्षाचे नेते अनिल देसाई यांच्याकडे पाठवला आहे.

३. खासदार संजय जाधव (परभणी) – ‘धोंडे जेवण’ कार्यक्रम

परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील आजच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत. मतदारसंघात सुरू असलेल्या ‘धोंडे जेवणाच्या’ कौटुंबिक कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नसल्याचे समोर आले आहे. मात्र, सुरुवातीला त्यांच्याकडून पक्षाला कोणतेही स्पष्टीकरण न गेल्याने काही काळ चिंतेचे वातावरण होते.

4. संजय दिना पाटील (खासदार, ईशान्य मुंबई): हे अद्याप ‘मातोश्री’वर पोहोचलेले नाहीत, मात्र त्यांनी आपण बैठकीला येत असल्याचे पक्षाला आधीच कळवले आहे.

Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’च्या सावटात ठाकरेंची रणनीती

ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत. त्यापैकी 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठल्यामुळे या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. जरी काही खासदार वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे गैरहजर असले, तरी ऐन बैठकीच्या वेळी शिर्डीचे खासदार वाकचौरे यांचे ‘नॉट रिचेबल’ असणे ठाकरे गटाची धाकधूक वाढवणारे ठरत आहे. आता या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित खासदारांना काय कानमंत्र देतात? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: मोठी बातमी: उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व खासदारांची बैठक, पण भाऊसाहेब वाकचौरे अचानक ‘नॉट रिचेबल’; ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *