FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका


FDA Raids on 5 Star Hotels बंगळुरु: कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे अन्न व औषध प्रशासनानं मोठ्या थ्री स्टार आणि पंचतारांकित हॉटेलवर छापेमारी केली होती. या छापेमारीत काही हॉटेलमध्ये किचन आणि खाण्या पिण्याच्या वस्तू खराब झाल्याचं दिसून आलं. अधिकाऱ्यांनी मुदत संपलेलं दूध, खराब झालेलं मांस आणि सडलेल्या भाज्या यासह खराब झालेल्या दुसऱ्या वस्तू देखील तिथून जप्त करुन नष्ट केल्या आहेत.   

बंगळुरु शहर जिल्ह्यात BBMP  विभागात खास तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची 30 पथकं तयार करण्यात आली होती.या पथकांनी एकूण 26 हॉटेलमध्ये तपासणी केली. हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील नियमांचं पालन केलं जातंय की नाही हे तपासलं जाणार आहे. 

नमुने तपासणीसाठी पाठवले 

अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या तपासणी दरम्यान 35 नमुने जमा केले आहेत. यामध्ये चिकन, मटण, मासे, खाद्यतेल, दूध, मसाले, चहा पावडर, चीज, टमाटर सॉस आणि लिंबाचा रस यासारख्या वस्तूंचा समावेश होता. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.  

हॉटेलमध्ये खराब भाज्या सापडल्या 

हॉटेलमध्ये तपासणी करताना एफडीएच्या पथकांना किचन आणि वस्तू ठेवलेल्या ठिकाणी स्वच्छता कमी प्रमाणात दिसून आली. अधिकाऱ्यांना मुदत संपलेले खाद्यपदार्थ  आणि भाज्यांवर बुरशी आढळून आली. याशिवाय खाण्याच्या वस्तू देखील योग्य प्रकारे ठेवलेल्या नव्हत्या असं दिसून आलं. काही ठिकाणी चुकीची माहिती असलेली उत्पादनं आढळून आली. एफएसएसएआय च्या नियमांशी संदर्भातील पालन करण्यात नसल्याचं आढळून आलं. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी लागणारं साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था नसल्याचं दिसून आलं. या त्रुटींबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलचालकांना नोटीस जारी केली आहे. जेव्हा नियमभंग केल्याचं स्पष्ट होईल तेव्हा अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 नुसार कारवाई केली जाईल.

खराब साहित्य जप्त

रिपोर्टनुसार कारवाई दरम्यान काही हॉटेल्समधून मोठ्या प्रमाणावर मदत संपलेलं आणि खराब झालेलं साहित्य जप्त करण्यात आलं. एफडीएनं सर्व हॉटेल आणि व्यावसायिकांना अन्नाची सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे. नियमांचं पालन करु न शकणाऱ्या हॉटेलचालकांवर कठोर कायदेशीर केली जाईल, असं म्हटलं.  

कर्नाटकचे आरोग्यमंत्री यूटी खादर यांनी म्हटलं की तपासणीचा उद्देश मोठ्या,महागड्या हॉटेलमध्ये अन्नाची सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं योग्य पालन होतं की नाही हा होता. मोठ्या हॉटेलवर कारवाई केल्यानं छोट्या व्यावसायिकांना देखील नियमांचं पालन करावं लागेल.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *