Eetha Teaser: प्रसूतीत वेदनेनं विव्हळत होती ‘ईठा’, पण तरीही.. अंगावर काटा आणणारा टीझर पाहून लेकीची भावुक पोस्ट


Shraddha Kapoor Eetha: ‘स्त्री 2’ (Stree 2) हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकवर्ग अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान आता, ‘ईठा’ सिनेमाचा टीझर सोशल मीडियात लीक झाल्यानंतर हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. काही तासांपूर्वी  ‘ईठा’ (Eetha) सिनेमाचा बहुचर्चित टीझर  रिलीज झाला असून, प्रेक्षकांनी श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं तोंडभरुन कौतुक केलंय. ‘ईठा’ या सिनेमातून श्रद्धा कपूरचा कधी न पाहिलेला लूक  पाहायला मिळत आहे. ‘कॉकटेल 2’ (Cocktail 2) सिनेमा प्रदर्शनाआधी  ‘ईठा’ सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. टीझर  लीक झाल्यानंतर अखेर आज  मॅडॉक फिल्म्सने या सिनेमाचा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज केलाय. 

‘ईठा’  सिनेमाचा टीझर स्व. विठाबाईंच्या लेकीकडून सोशल मीडियात शेअर (Vithabai Narayangaonkar Eetha Movie Teaser)

‘ईठा’ या सिनेमातून तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांचे जीवनप्रवास दाखवण्यात आले आहे.  विठाबाईंनी आपल्या आयुष्यात बरेच चढ उतार पाहिले आहेत. त्यांचा खडतर जीवनप्रवास ‘ईठा’ या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.  अंगावर काटा आणणाऱ्या या टीझरमध्ये (Entertainment) ‘ईठा’अर्थात श्रद्धा कपूर प्रसूती वेदनेत विव्हळत असते. मंचावरील सादरीकरण अर्ध्यावर सोडून त्या बाळाला जन्म देतात. नंतर त्याच अवस्थेत मंचावर जाऊन  लावणी सादर करतात. यातून त्यांचं कलेवर असलेलं प्रेम दिसून येते. हा सीन अंगावर काटा आणणारा आहे. 

‘ईठा’ सिनेमाचा टीझर व्हायरल होताच प्रेक्षकांनी श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलंय. दरम्यान, स्व. विठाबाई नारायणगावकर यांची कन्या आणि ज्येष्ठ तमाशा कलाकार  मंगला बनसोडे यांनीही  ‘ईठा’ सिनेमाचा टीझर सोशल मीडियात शेअर केला आहे. तसेच पोस्टला भावनिक कॅप्शनही दिलंय. ‘माझ्या आईच्या जीवनावर आधारित भव्य बॉलीवूड चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे! आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की, हा टीझर नक्की पाहावा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा’.

‘एका आईच्या संघर्ष, त्याग आणि प्रेरणादायी प्रवासाची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. आपला एक शेअर आणि एक प्रतिसाद या सुंदर कलाकृतीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. संपूर्ण चित्रपटाच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करो, हीच सदिच्छा’, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या  सिनेमाला संगीत अजय – अतुल यांनी दिले असून, या चित्रपटाच्या संपूर्ण अल्बमच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसूती कळा, नाळ ठेचली अन् त्याच जोमात मंचावर उभी राहिली, ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा टीझर; श्रद्धा कपूरसह कोण झळकणार?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *