विदर्भात 23 जून रोजी काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी उष्णतेची लाट कायम आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत हिट वेव्हचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
