Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026: सातारा- सांगली विधान परिषद निवडणुकीत (Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026) भाजपाचा उमेदवार विजयी झाला असला तरी फुटलेल्या 100 मतांवरून आता राजकारण तापण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या फुटलेल्या मतांवरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता थेट निशाणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर साधला आहे. कराड येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना आम्ही नक्की हिशोब करू, हिशोबात आम्ही पक्के आहोत. अनेक लोकांच्या ओठात एक, मनात एक आणि करतात आणखी वेगळं होतं. परंतु, ते कोणालाही शक्यं झालं नाही. तर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा महायुतीसोबत राहिले का, हे देवाला माहिती, असे म्हणत जयकुमार गोरे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत 301 मतांनी विजय मिळवल्यानंतर भाजपाचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026)
तर आम्ही हिशेबात पक्के, वेळ आल्यावर हिशेब नक्की करु असं म्हणत जयकुमार गोरेंनी शंभुराज देसाईंना इशारा दिला आहे. सातारा जिल्हा परिषदेनंतर विधान परिषदेतही महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. आम्ही नक्की हिशोब करू, आम्ही हिशोबात पक्के आहोत असा इशारा देखील जयकुमार गोरेंनी दिला आहे.(Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026)
Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026: तब्बल शंभरावर मते फुटल्याचा दावा
सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला असला, तरी शंभरावर फुटलेल्या मतांनी करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वत:च्या बालेकिल्ल्यात जयकुमार गोरे यांना धक्का बसला आहे. धैर्यशील कदम यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अभयसिंह जगताप यांच्यात थेट लढत होती. धैर्यशील कदम यांना 885 पैकी 593 मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना 292 मते मिळाली. 9 मते अवैध त्यामुळे धैर्यशील कदम यांचा विजय झाला असला, तरी शंभरावर मते फुटल्याचा दावा केला जात आहे.त्यामुळे जयकुमार गोरेंचा राष्ट्रवादीकडून करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा रंगली आहे. विधानपरिषद निवडणुकी महायुतीचे उमेदवार विजयी होणार हे जवळपास निश्चित होते. एकतर्फी लढत होऊ नये म्हणून महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आले होते. मात्र, लढत झालेल्या ठिकाणी महाविकास आघाडीसह महायुतीची सुद्धा मते फुटली आहेत. नाशिकमध्ये तर महायुतीचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला, याठिकाणी अपक्ष गोकुळ गीते यांनी बाजी मारली. सुरुवातीला भाजपबाबत नाराजी व्यक्त करणारे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर कदम यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मंत्री मकरंद पाटील यांनीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर महायुती धर्म पाळत कदम यांना पाठिंबा दिला आणि आपल्या समर्थक सदस्यांची समजूत काढली होती.
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story