Shilpa Shirodkar on Dil Se Movie Chaiyya Chaiyya Song: शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) ही एकेकाळची सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री. तिनं आपल्या कारकिर्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनेक बड्या सेलिब्रिटींसोबत स्क्रीन शेअर केली आहे. तिला आपल्या कारकिर्दीत शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) सुपरहिट गाण्यामध्ये काम करण्याचीही संधी मिळाली होती. पण तिची ही संधी केवळ वजनामुळे हुकली. बॉलिवूडमध्ये अनेकदा वजन, लुक आणि उंचीवरुन नाकारलं जातं. या कारणामुळे हातातून संधी निघून जाते. असाच काहीसा प्रकार (Entertainment) शिल्पा शिरोडकरसोबत घडला. तिला ‘दिल से रे’ या सिनेमातील ‘छैया छैया’ या गाण्यात झळकण्याची संधी मिळाली होती. परंतु, वजनामुळे (Dil se) तिच्या हातातून ही संधी सुटली. ऐनवेळी तिच्या हातातून ही संधी कशी सुटली, नेमकं घडलं काय? याचा खुलासा अभिनेत्रीने (Chaiyya Chaiyya) ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5’ या रिअॅलिटी शोमधून केला होता. नक्की घडलं काय होतं? जाणून घेऊयात.
‘छैया छैया’ या गाण्यासाठी आधी कुणाची निवड झाली होती? (Shilpa Shirodkar on Chaiya Chaiya Song)
‘दिल से’ या सिनेमातील ‘छैया छैया’ हे गाणं आजही लोक आवडीने ऐकतात. रिंगटोन असो किंवा प्ले लिस्ट, ‘छैया छैया’ या गाण्याची क्रेझ सातासमुद्रापार गेली आहे. या गाण्यात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि डान्सिंग क्विन मलायका अरोरा यांची जोडी पाहायला मिळते. ‘छैया छैया’ या गाण्याला बरीच वर्षे झाली. ‘इंडियाज
बेस्ट डान्सर सीझन 5′ या रिअॅलिटी शोमध्ये हर्ष लिंबाचिया याने शिल्पा शिरोडकरला ‘छैया छैया’ या गाण्याविषयी प्रश्न विचारला. “मॅम आम्ही असं ऐकलं होतं की, ‘छैया छैया’ हे गाणं आधी तुम्हाला ऑफर करण्यात आलं होतं” यावर शिल्पा हो असं उत्तर देत म्हणते, “छैया छैया’ हे गाणं मला ऑफर झालं होतं. फराहने मला या गाण्यासाठी विचारलं होतं”, असं शिल्पा म्हणाली.
“ती मला तेव्हा म्हणाली होती की, एक गाणं आहे, त्यासाठी तुला वजन कमी करावं लागेल. मी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. उकडलेल्या भाज्या खाल्ल्या. तेव्हा माझं वजन कमी झालं असेल, पण फराहला जितकं या गाण्यासाठी हवं तितकं कदाचित झालं नसावं. मला तेव्हा फराह, सॉरी तू खूप जाड आहेस, हे गाणं मी तुला नाही देऊ शकत, असं म्हणाली होती. मग यानंतर मलायका अरोराची या गाण्यासाठी निवड झाली”, असं अभिनेत्री म्हणाली.
1998 साली मणी रत्नम दिग्दर्शित ‘दिल से’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये प्रचंड वाढली. या सिनेमातून एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळते. या सिनेमात किंग खान शाहरुख खान, मनीषा कोइराला आणि प्रीटी झिंटा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर , या एव्हरग्रीन सिनेमाला ए.आर रहमान यांनी संगीत दिलं आहे. शाहरुख खानचा हा सिनेमा आजही लोक आवर्जून पाहतात. या सिनेमातील संगीत अजूनही लोकांमध्ये अजरामर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
दुसऱ्या रविवारीही ‘वेल्कम टू द जंगल’ ची दमदार कमाई, 100 कोटींचा आकडा पार, 10 व्या दिवशी किती कमावले?