Last Updated:
नागिणीने पाठलाग करून बदल घेतल्याचं आपण पाहिलं असेल पण, एका हत्तीने पाठलाग करून एका कुटुंबातील २ लोकांचा जीव घेतला आहे. ही पहिलीच वेळ नाहीये, तर
हाथी मेरे साथी नावाचा सिनेमा आजही आपल्याकडे एक आदर्श म्हणून पाहिला जातो. माणूस आणि प्राण्यामध्ये मैत्री किती चांगली असू शकते, याचं हे उदाहरण आहे. हा सिनेमा जरी असला तरी हत्तीबद्दल माणसं प्रचंड सहानुभूती दाखवतात. पण, आजपर्यंत नाग किंवा नागिणीने पाठलाग करून बदल घेतल्याचं आपण पाहिलं असेल पण, एका हत्तीने पाठलाग करून एका कुटुंबातील २ लोकांचा जीव घेतला आहे. ही पहिलीच वेळ नाहीये, तर याआधी 14 वर्षांपूर्वी सुद्धा याच हत्तीने याच कुटुंबातील २ जणांना ठार मारं होतं. त्यानंतर या कुटुंबीयांनी घर सोडलं आणि पत्ता बदलला, पण हत्ती तिथेही आला.
मिळालेल्या माहितीनुसार, या हत्तीचं नाव हे धुरबे असं आहे. ही विचित्र घटना नेपाळमध्ये घडली आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. चितवन राष्ट्रीय उद्यानाचे सूचना आणि संरक्षण अधिकारी अबिनाश थापा यांनी याबद्दल पुष्टी केली आहे. हत्तीवर नजर ठेवण्यासाठी ट्रॅकर लावला होता. जेव्हा डेटा तपासला तेव्हा हा हत्ती घराजवळच आढळून आला. आतापर्यंत धुरबे हत्तीने 25 जणांचा जीव घेता आहे. मृतांमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. जे पार्कमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते.
धुरबे हत्तीने आतापर्यंत 25 जणांचा जीव घेतला आहे. पीडित व्यक्ती शनिचारा हा जगतपूर इथं राहणार आहे. काठमांडू पोस्टशी बोलताना शनिचाराने सांगितलं की, 14 वर्षांपूर्वी 16 डिसेंबबर 2012 रोजी धुरबे हत्तीने त्याचे वडील बुधीराम आणि आई झरली यांची चिरडून हत्या केली. त्यावेळी या हत्तीने चितवन राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात धुडगूस घातला होता. या घटनेनंतर शनिचारा याने घर बदललं, रेऊ आणि राप्ती नदी पार करूबन तो जगतपूरमध्ये राहण्यासाठी केला. त्याला वाटत होतं इथं हत्ती येणार नाही. पण, दोन दिवसांपूर्वीच धुरबे हत्तीने घरावर हल्ला केला आणि त्याची सून आशिका आणि ४ वर्षांच्या नातवाचा जीव घेतला
धुरबे हत्तीने मानवी वस्तीत घुसून धुडगूस घातला जवळपास 25 जणांचा जीव घेतला. त्यामुळे 2012 मध्ये त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पण चितवन राष्ट्रीय उद्यानाचे संरक्षण अधिकारी अबिनाश थापा यांनी सांगितलं की, जेव्हा गोळीबार केला होता तेव्हा हत्ती हा जंगलामध्ये पळून गेला होता. त्याला शोधून काढण्यासाठी जवळपास 16 लाख खर्च झाला होता.,पण तो सापडला नाही. त्यानंतर त्याचा गोळीबारात मृत्यू झाला असं जाहीर करावं लागलं. पण, 2016 मध्ये अचानक धुरबे नावाचा हाच हत्ती परत आला. त्याने आपला परिसरही वाढवला होता. 2023 मध्ये त्याच्यावर ट्रॅकर लावला होता. त्यातून आता त्याचा डेटा मिळत आहे.
नागासारखं हत्ती लोकांना लक्षात ठेवू शकतो का, याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. आफ्रिकन हत्तीवर अभ्यासक डॉ. जॉयस पूल आणि सिंथिया मॉस यांन सांगितलं की, हत्ती हा बुद्धिमान जीव आहे. तो परिस्थिती आणि ठिकाण हे लक्षात ठेवतो. त्याला एखाद्या ठिकाणी वाटत असलेली भिती, झालेला हल्ला हा त्याच्या लक्षात राहतो. त्याामुळे अशा ठिकाणी जर ते परत आले तर आणखी आक्रमक होतात. एवढंच नाहीतर हत्तीच्या झुंडीमधील मादा हत्ती ही पाण्याचा साठा कुठे आहे हे लक्षात ठेवते. कोरडे रस्ते, कुठे खाण्यासाठी मिळेल, असे मार्ग नेहमी लक्षात ठेवते.
काठमांडू पोस्टशी बोलताना गेलाघारी बफर झोन समितीचे अध्यक्ष लाल बहादुर यांनीही या घटनेबद्दल पुष्टी केली आहे. मागील 9 ते 10 वर्षांपासून धुरबे हत्तीला गावाच्या जवळ पाहिलं आहे. मानवी वस्तीमध्ये हत्तीने शिरकाव करून नासधुस केली आहे. प्रत्येक वर्षी धुरबे हत्ती हे गावात परत येत असतात, असं लाल यांनी सांगितलं.
Mumbai,Maharashtra
Dhurbe Elephant: नागिन सिनेमासारखी स्टोरी, आधी आई-वडिलांना मारलं; 14 वर्षांनी परत येऊन हत्तीने सून आणि नातवाला संपवलं!
