Dhurandhar Production Designer sexual Harrasment Case: धुरंधरच्या प्रोडक्शन डिझायनरवर लैंगिक छळाचा गुन्हा; एकटीलाच हॉटेलमध्ये बोलवलं अन्..; आरोपीची जामिनावर सुटका


Dhurandhar Production Designer sexual Harrasment Case: ‘धुरंधर’ आणि ‘द फॅमिली मॅन’ या प्रोजेक्ट्ससाठी काम केलेले प्रॉडक्शन डिझायनर सैनी एस. जोहराय (Saini S Johray) यांना चंदीगडमध्ये अटक करण्यात आली आहे. एका महिलेने त्यांच्यावर अत्याचार, बेकायदेशीररित्या डांबून ठेवणे आणि शारीरिक मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, जोहराय यांनी कामाच्या मिटिंगच्या बहाण्याने संबंधित महिलेला सेक्टर-17 मधील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. (Harrasment Case)

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने नंतर त्यांना जामीन मंजूर केल्याचे वृत्त आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे. सैनी यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

नेमके प्रकरण काय?

महिलेने केलेल्या आरोपानुसार, ‘ सैनी एस. जोहराय यांनी तिला कामाची चर्चा करण्याच्या बहाण्याने चंदीगड मधील ताजमध्ये एका खोलीत बोलवलं. त्यानंतर तिचा लैंगिक छळ केला. तिला डांबून ठेवल्याचा आरोप ही पिढी त्याने केला आहे. महिलेने आपला तक्रारीत आरोप केलाय की ‘ सैनी यांनी तिच्या पेयात संशयास्पद पदार्थ मिसळला त्यानंतर तिची प्रकृती खालवली. महिलेने दिलेला माहितीनुसार ‘सरकारी महाविद्यालयात शिकत असताना एका प्राध्यापकाने तिचा बायोडेटा धुरंधरच्या टीमला पाठवला होता. 2 सप्टेंबर 2025 रोजी तिची सहाय्यक कलादिक दर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सैनी यांनी स्वतःची ओळख तिचा मार्गदर्शक म्हणून करून दिली व तो दिल्ली  आर्ट कॉलेजचा विद्यार्थी असल्याचेही सांगितलं. नंतर कामाशी संबंधित एका मीटिंगसाठी चंदिगड मधील एका हॉटेलरूम मध्ये बोलावलं. सुरुवातीला टीमचे सदस्य उपस्थित असतील अस तिला वाटलं पण नंतर लक्षात आलं की आपल्या एकटीलाच बोलावलं आहे.  

’10 सप्टेंबर 2025 रोजी 8.30 च्या सुमारास महिला हॉटेलमध्ये पोहोचली होती. त्यावेळी सैनी यांनी तिला जबरदस्ती दारू पाजण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर तिला लगेच चक्कर येऊ लागली. तिने वारंवार रूम मधून बाहेर जाऊ देण्याची विनंती केली पण तिला बाहेर जाऊ दिलं नाही. असा आरोप महिलेने केला. डान्स शिकवण्याच्या बहाण्याने सैनी यांनी महिलेस चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला .तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार ‘ पुढील काही मिनिटात महिलेची प्रकृती अधिक खालावली. तिला उलट्या झाल्या.पण तरीही सैनीने तिच्याशी गैरवर्तन सुरूच ठेवलं. त्यावेळी महिला खूप घाबरलेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती हॉटेलमधून निघून गेली. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *