Deva Bhau Taxi: महायुती सरकारचं मोठं पाऊल, मुंबईमध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास | ऑटो


Last Updated:

आता मुंबई आणि एममएमआरडी परिसरामध्ये देवाभाऊ टॅक्सी आणि छावा टॅक्सी सेवा येणार आहे” अशी माहिती भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. 

(प्रतिकात्मक फोटो AI)
(प्रतिकात्मक फोटो AI)

मुंबई: मुंबई आणि उपनगरामध्ये ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या खासगी टॅक्सीने चांगलेच हातपाय पसरले आहे. पण, या खासगी कंपन्यांच्या कमिशनगिरीमुळे चालक आणि मालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे याच धर्तीवर आता राज्य सरकार आता स्वस्तात मस्त अशी देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी सेवा आणणार आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी देवाभाऊ टॅक्सी सेवा लवकरच सुरू करणार आहे, अशी माहिती दिली आहे.

दिल्ली आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये राज्य सरकारकडून भारत टॅक्सी अॅप चालवले जाते. आता याच धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य सरकार देवाभाऊ टॅक्सी आणि छावा टॅक्सी अॅप सुरू करणार आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.

“दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारत टॅक्सी सेवा आणली आहे. या टॅक्सीमुळे चालक आणि मालकाला फायदा होत आहे. त्या ठिकाणी या खासगी टॅक्सी कंपन्या भरमसाठ कमिशन लादून चालकाकडून पैसे लाटत असतात. पण भारत टॅक्सीमुळे याला आळा बसला आहे. टॅक्सी चालक आणि मालकांना फायदा झाला आहे. आता मुंबई आणि एममएमआरडी परिसरामध्ये देवाभाऊ टॅक्सी आणि छावा टॅक्सी सेवा येणार आहे” असं दरेकर यांनी सांगितलं.

एमएमआरडीए परिसरात होणार पहिली सुरुवात

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली आणि या योजनेला हिरवा कंदील दिला. याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आजच या संदर्भात धोरण नक्की केलं आहे. सर्व नियम आणि नियमावली तयार झाली आहे. लवकरत देवाभाऊ सहकार टॅक्सी मुंबई आणि एमएमआरडीए परिसरात येणार आहे’ असंही दरेकर यांनी स्पष्ट केलं.

2 ते 5 हजार टॅक्सी सुरू होणार

“या टॅक्सी सेवेमुळे ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कंपन्या आहे ज्या भरमसाठ कमिशन घेत असतात. आता नफा थेट चालक आणि मालकाला मिळणार आहे. त्यामुळे मुंबई करांना चांगली सेवा मिळणार आहे. याचा फायदा चालकांना होणार आहे, यासाठी नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पहिल्या फेजमध्ये २ ते ५ हजार वाहनं हे एमएमआरडीए परिसरात उपलब्ध होतील’ असंही त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/ऑटो/

Deva Bhau Taxi: महायुती सरकारचं मोठं पाऊल, मुंबईमध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *