Crime Files: लग्न, पहिली रात्र अन् ती गोळी… 19 मुलींचा मर्डर, मोहनच्या सैतानी कृत्याने देश हादरला! | क्राइम बातम्या


दुसऱ्या दिवशी सकाळी…

दुसऱ्या दिवशी सकाळी ती महिला एका बसस्थानकाच्या महिला स्वच्छतागृहात मृतावस्थेत सापडली तिच्या शरीरावर जखमेची एकही खूण नव्हती. संघर्षाचे कोणतेही चिन्ह नव्हते.हत्या झाल्याचा पुरावा नव्हता. पहिल्या नजरेत तो आत्महत्येचा प्रकार वाटत होता पण ही आत्महत्या नव्हत आणि ही पहिली घटना देखील नव्हती.गेल्या काही वर्षांत कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे अनेक महिलांचे मृतदेह सापडले होते.

कोण होता मोहन? 

प्रत्येक वेळी एकच पॅटर्न, एक महिला, नुकतंच लग्न झालेलं, बसस्थानक, स्वच्छतागृह आणि गूढ मृत्यू. पोलिसांना तेव्हा माहिती नव्हतं की ते भारताच्या सर्वात भयानक सिरीयल किलरपैकी एकाच्या मागावर आहेत त्याचं नाव होतं मोहन कुमार. पण देश त्याला दुसऱ्या नावाने ओळखू लागला सायनाइड मोहन. जो गर्दीत सहज मिसळून जायचा सिरीयल किलर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एखादा भयावह चेहरा उभा राहतो पण मोहन कुमार तसा नव्हता. तो गँगस्टर नव्हता. त्याच्याकडे बंदूक नव्हती. चाकू नव्हता.तो एक शिक्षित व्यक्ती होता. एका काळी तो पी.टी शिक्षक होता. समाजात सामान्य आयुष्य जगणारा माणूस आणि कदाचित हाच त्याचा सर्वात मोठा फायदा होता. कारण कोणीही त्याच्याकडे पाहून त्याला खुनी म्हणालं नसतं.

त्याच्या जाळ्यात कोण अडकत होतं?

मोहन कुमार आपल्या शिकारांची निवड अतिशय काळजीपूर्वक करायचा त्याच्या निशाण्यावर असायच्या गरीब कुटुंबातील महिला असायच्या. हुंड्यामुळे लग्न न झालेल्या मुली.वय वाढल्यामुळे समाजाच्या दबावाखाली असलेल्या महिला.अजून लग्न नाही?, मुलगा मिळत नाही का?, वय वाढत चाललंय… या प्रश्नांनी आधीच त्रस्त असलेल्या महिलांना मोहन आशेचा किरण वाटायचा. तो म्हणायचा,मला हुंडा नको, मी तुझ्याशी लग्न करेन. मी तुला स्वीकारतो आणि इथेच त्याचा खेळ सुरू व्हायचा.

प्रेम, लग्न आणि मग मृत्यू

मोहनची पद्धत जवळपास प्रत्येक वेळी सारखीच असायची. पहिली ओळख मग मैत्री, मग प्रेम आणि मग लग्नाचं आश्वासन काही प्रकरणांमध्ये मंदिरात लग्न मंगळसूत्र, सिंदूर, फोटो सगळं अगदी खरंखुरं वाटावं असंच. महिलेला वाटायचं तिची संघर्षाची वर्षं संपली.तिला तिचा संसार मिळाला पण खरी कहाणी इथूनच सुरू व्हायची.

मृत्यूची गोळी

लग्नानंतर तो महिलेला एखाद्या लॉजमध्ये घेऊन जायचा पती-पत्नीप्रमाणे रात्र घालवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बसस्थानकात घेऊन जायचा त्यानंतर तो एक छोटीशी गोळी द्यायचा.तो म्हणायचा, आत्ता मुल नको, ही गर्भनिरोधक गोळी खाऊन घे. महिला त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायची.कारण ती गोळी देणारा व्यक्ती तिचा नवरा होता पण ती गोळी गर्भनिरोधक नव्हती.ते सायनाइड होतं अत्यंत विषारी रसायन. जे काही मिनिटांत माणसाचा जीव घेऊ शकतं. महिला स्वच्छतागृहात जाऊन गोळी घ्यायची आणि काही क्षणांत कोसळायची तिचा मृत्यू व्हायचा आणि तोपर्यंत मोहन गायब झालेला असायचा.

पोलिसांना संशय का आला नाही?

आज हा प्रश्न विचारणं सोपं आहे पण त्या काळात परिस्थिती वेगळी होती.एका जिल्ह्यात एक मृत्यू, दुसऱ्या जिल्ह्यात दुसरा, तिसऱ्या जिल्ह्यात तिसरा. प्रत्येक तपास वेगळा, प्रत्येक पोलीस ठाणं वेगळं, प्रत्येक केस स्वतंत्र.कोणीही या सर्व मृत्यूंमागे एकच व्यक्ती असू शकते असा विचार केला नाही आणि मोहनला नेमकं हेच हवं होतं.

एक चूक आणि सगळं उघड झालं

प्रत्येक गुन्हेगार एक ना एक दिवस चूक करतो मोहननेही केली. एका महिलेच्या बेपत्ता होण्याच्या तपासात पोलिसांना मोबाईल कॉल रेकॉर्डमध्ये काही समान धागे सापडले. एका नंबरचा संबंध दुसऱ्या प्रकरणाशी जोडला गेल त्यानंतर तिसऱ्या आणि मग चौथ्या. हळूहळू पोलिसांच्या लक्षात आलं की अनेक महिलांच्या आयुष्यात एकच व्यक्ती आली होती मोहन कुमार आणि इथून त्याचा अंत सुरू झाला त्याचा खरा चेहरा जगासमोर आला.

चौकशीत काय समोर आलं?

अटक झाल्यानंतरच्या चौकशीत एकामागोमाग एक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या.एक, दोन, पाच, दहा आणि मग संख्या वाढतच गेली.तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला कारण ते एका सामान्य गुन्हेगारासमोर नव्हते.ते एका सिरीयल किलरसमोर बसले होते.

अशा व्यक्तीसमोर ज्याने वर्षानुवर्षे प्रेम, लग्न आणि विश्वास यांचा वापर करून महिलांना मृत्यूच्या दारात ढकललं होतं.

मोहन कसा ओढायचा जाळ्यात? 

विश्वास. कारण एखादा अनोळखी व्यक्तीने गोळी दिली असती तर कदाचित कोणी ती घेतली नसती.पण नवऱ्याने दिलेली गोळी? तिथे शंका निर्माण होत नाही आणि मोहनला नेमकं हेच माहीत होतं. तो विष विकत नव्हता तो विश्वास विकत होता आणि मग त्याच विश्वासाला मृत्यूमध्ये बदलत होता. तुम्ही आयुष्यभर लग्नाची वाट पाहत आहात. कोणीतरी येतं, तुमच्यावर प्रेम करतं, तुमच्याशी लग्न करतं.तुम्हाला आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतं आणि दुसऱ्याच दिवशी तुमच्या हातात मृत्यूची गोळी ठेवतं. ही फक्त सिरीयल किलरची कथा नाही. ही विश्वासाच्या खुनाची कथा आहे आणि म्हणूनच सायनाइड मोहनचं नाव आजही भारतातील सर्वात भयानक गुन्हेगारांमध्ये घेतलं जातं. कारण बंदुकीचा आवाज ऐकू येतो, चाकूचा वार दिसतो पण विश्वासाचा घात तो अनेकदा खूप उशिरा लक्षात येतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *