Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेत काय घडलं?


Mee Jinkun Ghein Saara Serial: ‘कलर्स मराठी’वरील (Colour Marathi) ‘मी जिंकून घेईन सारं’ (Mi Jinkun Ghein Sara) ही मालिका सध्या अत्यंत रंजक आणि नाट्यमय वळणावर आली आहे. छवीचा राजगुरूंच्या घरात अधिकृतपणे गृहप्रवेश झाला असून, बाईआजींनी तिला घराची सून म्हणून मनापासून स्वीकारले आहे. छवी आणि अनिकेत यांच्यातील नात्यात अजूनही काहीसा दुरावा आणि अवघडलेपण असले, तरी बाईआजी या दोघांना जवळ आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडे राजगुरू परिवाराचा सर्वनाश करण्याच्या इर्षेने पेटलेली शांभवी, बेबी आत्यासोबत मिळून छवीविरुद्ध नवनवीन कारस्थानं रचण्यात व्यस्त आहे. 

येत्या भागांमध्ये हे कौटुंबिक नाट्य आणि अंतर्गत कलह आणखीनच तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राजगुरू परिवाराचा विनाश करू इच्छिणाऱ्या शांभवीला रोखण्यासाठी छवी आता सज्ज आहे. तर, तिने शांभवीला देखील ठणकावून सांगितले आहे आता इशारा दिला आहे पुढच्यावेळीस नेम माझा असेल… छवी खंबीरपणे राजगुरू परिवारासोबत उभी आहे, पण ती शांभवीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा आणि कधी आणणार हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा, ‘मी जिंकून घेईन सारं’, येत्या दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. 

राजगुरू परिवाराचा विनाश करू इच्छिणाऱ्या शांभवीला रोखण्यासाठी छवी आहे सज्ज (Rajguru Family Faces New Threat as Shambhavis Secrets Begin to Unfold)

वटसावित्रीच्या पूजेच्या निमित्ताने घरात उत्साहाचे वातावरण असले, तरी पडद्यामागे शांभवी छवीचे लग्न मोडण्याची सुप्त शपथ घेऊन बसली आहे. दरम्यान, छवीला सतत अडचणीत आणण्याचा बेबी आत्याचा प्रयत्न चालूच आहे. अशातच शांभवीला ‘राजनाथ’ नावाच्या व्यक्तीकडून 50 लाख रुपयांची धमकी देणारे फोन येऊ लागतात, ज्यामुळे तिची अस्वस्थता वाढते. उत्तर पूजेच्या घाईगडबडीत घरात अचानक राजनाथची एक गुप्त फाईल येते, जी शांभवी छुप्या पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न करते. मात्र, शांभवीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या छवीच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाही आणि तिचा शांभवीवरील संशय आता अधिकच बळावला आहे.

दुसरीकडे, अनिकेत आणि छवी यांच्यात पहिल्यांदाच मनमोकळा संवाद होतो आणि अनिकेत तिच्यासोबत मैत्रीचे नाते जपण्याचा प्रामाणिक निर्णय घेतो. पण हा वाढणारा विश्वास शांभवीला खटकतो आणि ती मुद्दाम ‘जेसिका’च्या नावाचा वापर करून छवीच्या मनात अनिकेतबद्दल गैरसमज आणि अपराधीपणाची भावना निर्माण करते. या भावनिक गुंतागुंतीतच, बाईआजींच्या औषधांमध्ये पुन्हा एकदा जीवघेणा फेरफार केला जातो. आता शांभवीचा हा घातक चेहरा छवी संपूर्ण परिवारासमोर कसा आणणार आणि राजगुरू कुटुंबाला या विनाशापासून कशी वाचवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नक्की पहा, ‘मी जिंकून घेईन सारं’, येत्या 12 जुलै, संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?’ प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले ‘अशा वृत्तीच्या लोकांना…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *