नवी दिल्ली : अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीनं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीनं देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचं नवं (Cockroach Janta Party) एक्स अकाऊंट कॉकरोच इज बॅक या नावानं सुरु करण्यात आलं आहे. अभिजीत दीपके (Abhijeet Dipake) यांनी नवं एक्स खातं सुरु केल्याची माहिती दिली आहे. या पार्टीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील खात्यावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या नव्या प्लॅटफॉर्मचे फॉलोअर्स 43.6 हजारांवर पोहोचले आहेत. अभिजीत दीपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या खात्यावरील तिसऱ्याच पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यात आला आहे.
Dharmendra Pradhan must resign!
— Cockroach is Back (@Cockroachisback) May 21, 2026
नीट यूजीचा पेपर फुटला
नीट यूजी परीक्षा 3 मे रोजी पार पडली होती. त्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता नीट यूजी परीक्षा 21 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. नीट परीक्षेतील गोंधळावरुन लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार नसेल तर त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, असं राहुल गांधी म्हणाले होते. आता कॉकरोच जनता पार्टीनं देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अभिजीत दीपके कोण आहेत?
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेले महाराष्ट्रातील एक डिजिटल मीडिया आणि राजकीय संवाद रणनीतीकार आहेत. अभिजीत दीपके सध्या अमेरिकेत असून त्यांनी सुरु केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.
एक्स खातं बंद, इन्स्टाग्रामवर जोरदार प्रतिसाद
कॉकरोच जनता पार्टीचे एक्स खातं भारतात बंद करण्यात आल्यानंतर अभिजीत दीपके यांच्याकडून नवं खातं सुरु करण्यात आलं आहे. नव्या खात्याला देखील चांगला प्रतिसाद एक्स प्लॅटफॉर्मवर मिळत आहे. इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या वेगानं वाढत आहे. इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या 16 मिलियन्सवर पोहोचलीय. म्हणजेच फॉलोअर्सची संख्या 1 कोटी 60 लाखांवर पोहोचली आहे.
आणखी वाचा