CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत ‘हे’ 8 चित्रपट


CJP Protest Films Bollywood: देशात NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांची आंदोलने, सोनम वांगचुक यांचे आंदोलन आणि शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची युवकांची मागणी यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या विषयाकडे वेधले गेले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही विद्यार्थी आंदोलनांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील काही चित्रपट पुन्हा चर्चेत आले आहेत. बॉलिवूडने गेल्या काही वर्षांत सशक्त कथांच्या माध्यमातून आंदोलन, विद्यार्थी चळवळी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे यांसारख्या विषयांना हाताळले आहे. या चित्रपटांनी केवळ मनोरंजनच केले नाही, तर विद्यार्थ्यांचा रोष, संघर्ष, विद्यार्थी राजकारण आणि परिवर्तनासाठीची लढाई मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडली. जाणून घेऊया अशाच 8 चित्रपटांविषयी…

रंग दे बसंती (2006)

विद्यार्थी आंदोलनांवर आधारित सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘रंग दे बसंती’चा उल्लेख आवर्जून करावा लागतो. या चित्रपटात काही बेफिकीर महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या मित्राच्या मृत्यूनंतर भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आवाज उठवतात. त्यांचा हा विरोध हळूहळू मोठ्या जनआंदोलनाचे रूप धारण करतो. आज युवक शिक्षण व्यवस्था आणि सरकारच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करत असताना हा चित्रपट अधिकच टोकदार होतो.

CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

युवा (2004)

मणिरत्नम दिग्दर्शित ‘युवा’ हा चित्रपट विद्यार्थी राजकारणाची ताकद दाखवतो. चित्रपटात अजय देवगण एका जोशपूर्ण विद्यार्थी नेत्याच्या भूमिकेत दिसतो. तो युवकांना केवळ आंदोलन करण्याचे नव्हे, तर राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन व्यवस्था बदलण्याचे आवाहन करणारा आहे. बदल फक्त घोषणांनी होत नाही, तर सहभागातूनही घडतो अशी मांडणी या चित्रपटातून करण्यात आलीय.

CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

हजारों ख्वाहिशें ऐसी (2005)

सुधीर मिश्रा दिग्दर्शित हा चित्रपट 1970 च्या दशकातील राजकीय अस्थिरता आणि विद्यार्थी आंदोलनांची कथा मांडतो. सेंट स्टीफन्स कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी युवक कशा प्रकारे स्वतःचे आयुष्य पणाला लावतात, हे यात दाखवले आहे. नक्षलवादी चळवळ आणि विद्यार्थ्यांमधील राजकीय जाणीव यांचे गंभीर चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते.

CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

गुलाल (2009)

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गुलाल’ या चित्रपटात विद्यापीठातील राजकारण, सत्तेची लालसा, फुटीरतावाद आणि विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष वास्तववादी पद्धतीने दाखवण्यात आला आहे. विद्यार्थी आंदोलन केवळ आदर्शवादापुरते मर्यादित राहत नाही, तर अनेकदा सत्तेच्या राजकारणाचाही भाग बनते, हे या चित्रपटातून स्पष्ट होते.

CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

हासिल (2003)

इलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणावर आधारित’हासिल’ हा चित्रपट विद्यार्थी संघ निवडणुकांच्या माध्यमातून राजकारण, गुन्हेगारी आणि युवकांचा संघर्ष उलगडतो. शैक्षणिक संस्थांमधील राजकारणावर बाहुबल आणि गुन्हेगारीचा कसा प्रभाव पडतो आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर काय परिणाम होतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

आरक्षण (2011)

प्रकाश झा दिग्दर्शित ‘आरक्षण’ हा चित्रपट शिक्षण व्यवस्था, सामाजिक न्याय आणि आरक्षणासारख्या संवेदनशील विषयांवर आधारित आहे. आरक्षण धोरणावरून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला विरोध, आंदोलने आणि समाजातील वाद या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. शिक्षणाशी संबंधित निर्णयांचा युवकांवर आणि समाजावर किती मोठा परिणाम होतो, हे या चित्रपटातून दिसून येते.

CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

सत्याग्रह (2013)

प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’ हा चित्रपट भ्रष्टाचार, जनआंदोलन आणिसत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा आहे.अमिताभ बच्चन, अजय देवगण, करीना कपूर खान, अर्जुन रामपाल आणि मनोज बाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अन्यायाविरोधात उभा ठाकलेला एक ज्येष्ठ समाजसेवक जनतेला सोबत घेऊन मोठं आंदोलन छेडतो. गांधीवादी विचारसरणी आणि लोकशक्तीच्या जोरावर व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणारा हा चित्रपट आजच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही तितकाच समर्पक वाटतो.

CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट

हुडदंग (2022)

‘हुडदंग’ हा चित्रपट 1990 मधील मंडल आयोग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. इलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरकारी निर्णयांविरोधात देशभर उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनांचे चित्रण यात करण्यात आले आहे. आज शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा आंदोलने होत असताना हा चित्रपट त्या ऐतिहासिक संघर्षांची आठवण करून देतो.

CJP Protest Films Bollywood: NEET, आंदोलनं आणि बदलाची हाक; आज प्रत्येक तरुणाने पाहावेत 'हे' 8 चित्रपट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *