Sunetra Pawar and Ajit Pawar : ‘माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला….’,अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!


बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांची आज जयंती आहे. बारामती येथे २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार (Ajit Pawar) यांचं निधन झालं. त्यानंतर आज त्यांची पहिली जयंती आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या (Ajit Pawar) स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार, जय पवार देखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या जयंती दिनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजितदादांच्या निधनानंतर ही पहिलीच जयंती असल्याने कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्येही अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळत आहे. आपल्या या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या (Ajit Pawar) आठवणींना उजाळा देत, हा दिवस ‘जयंती’ म्हणून स्वीकारणे मनाला अत्यंत वेदनादायी असल्याचे व्यक्त केले आहे. (Ajit Pawar)

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ…आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील…, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

NCP Sunetra Pawar Post : सुनेत्रा पवार यांची पोस्ट

दादा…
एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला…
घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..
पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.
हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात.
तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ…
आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही.
काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.
दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील…
माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम…!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *