Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा ‘या’ बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Standard Chartered Bank Layoffs नवी दिल्ली: स्टँडर्ड चार्टर्ड बँक येत्या चार वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत 7 हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचं नियोजन करत आहे. बँक नफा वाढवण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनचा वापर वाढवत आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या बँकेचं मुख्यालय लंडनमध्ये असून बँक 2030 पर्यंत कॉर्पोरेट विभागांमधून जवळपास 15 टक्के पदं कमी करण्याचं नियोजन करत आहे. …