Aakash Chopra’s Rule Suggestions BCCI IPL News : आयपीएल म्हटलं की चौकार-षटकारांचा पाऊस आलाच. पण गेल्या काही सीझनमध्ये फलंदाजांचंच राज्य दिसत असून 200+ स्कोर आता अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. सपाट खेळपट्ट्या, छोट्या बाउंड्री आणि धावांचा पाऊस यामुळे गोलंदाजांची अवस्था बिकट झाली आहे. याच मुद्द्यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी बीसीसीआय समोर 3 भन्नाट नियम सुचवले आहेत. आकाश चोप्रांचं मत आहे की या नव्या नियमांमुळे आयपीएलमध्ये पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळेल आणि सामन्यांचा थरार आणखी वाढेल.
3 विकेट घेतल्या तर मिळावी अतिरिक्त ओव्हर (Aakash Chopra’s Rule Suggestions BCCI IPL)
सध्या टी-20 क्रिकेटमध्ये कोणताही गोलंदाज जास्तीत जास्त 4 ओव्हर्स टाकू शकतो. मात्र आकाश चोप्रांनी भन्नाट आयडिया दिली आहे. एखाद्या गोलंदाजाने आपल्या 4 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स घेतल्या, तर त्याला पाचवा ओव्हर टाकण्याची संधी मिळावी. त्यामुळे चांगली गोलंदाजी करणाऱ्यांना बक्षीस मिळेल आणि फलंदाजांवर अतिरिक्त दबाव तयार होईल.
मोठ्या विजयाला मिळावा बोनस पॉइंट (Aakash Chopra’s Rule Suggestions BCCI IPL)
चोप्रांचा दुसरा सल्ला पॉइंट्स सिस्टमबाबत आहे. एखाद्या संघाने प्रतिस्पर्ध्यावर मोठा विजय मिळवला, तर त्या टीमला अतिरिक्त गुण मिळायला हवेत. उदाहरणार्थ, 15-16 ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठलं किंवा 40+ धावांनी सामना जिंकला, तर 2 ऐवजी 3 गुण मिळावेत. त्यामुळे फक्त विजय नव्हे, तर मोठा विजय मिळवण्यासाठीही संघांमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळेल.
100 मीटरच्या षटकाराला थेट 8 धावा (Aakash Chopra’s Rule Suggestions BCCI IPL)
सगळ्यात चर्चेत आलेला तिसरा नियम म्हणजे 100 मीटरपेक्षा मोठ्या षटकाराला 6 नव्हे तर थेट 8 धावा द्याव्यात. विशेष म्हणजे हा भन्नाट आयडिया याआधी रोहित शर्मा यांनीही मांडला होता. आकाश चोप्रांनी मान्य केलं की हा नियम थोडा वादग्रस्त ठरू शकतो, पण त्यामुळे फलंदाज आणखी मोठे फटके खेळण्याचा धोका पत्करतील आणि विकेट्स पडण्याची शक्यता वाढेल. परिणामी सामना अधिक थरारक होऊ शकतो.
हे ही वाचा –
आणखी वाचा