Budh Gochar 2026 : सावधान! अवघ्या काही तासांत वृषभसह ‘या’ 5 राशींना सावधानतेचा इशारा; बुध ग्रहाच्या उदयामुळे संकट येण्याची शक्यता, काऊंटडाऊन सुरु


Budh Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाचा अस्त लवकरच समाप्त होणार आहे. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, वाणी आणि व्यवसायाच स्वामी मानले जाते. बुध ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना सावध राहण्याचा इशारा देण्यात येतो. त्यामुळे या काळात काही राशींना खबरदारी घेण्याची गरज असते.  त्यानुसार, कोणकोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

बुधदेव तुमच्या दुसर्‍या घरात उदय पावत आहे. आर्थिक गोष्टी सुधारतील, परंतु अनावश्यक खर्च टाळा. उत्पन्नात वाढू होऊ शकते, पण कोणतीही गुंतवणूक घेण्यापूर्वी ठरवून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. घरात बोलताना आपल्या शब्दांवर ताबा ठेवणे महत्त्वाचे आहे. पैशांवरून कोणाशीही वाद घालणे टाळा आणि शांत राहून आपले काम पूर्ण करण्यावर लक्ष ठेवा.      

उपाय – आर्थिक गोष्टीचा निर्णय घेण्याआधीच विचार करुन ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा.  

कर्क रास (Cancer Horoscope)

बुधदेव या राशीच्या बाराव्या घरात उदय पावत आहे. जे घर खर्च आणि छुपे प्रश्न दर्शवतो. या कालावधीत तुमच्या वाढत्या खर्चावर आणि बाहेरच्या गोष्टींवर लक्ष ठेवावे लागेल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. याचे परिणाम भोगावे लागू शकतात. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

उपाय – मन शांत ठेवा आणि चुकीच्या गोष्टींवर वेळ खर्च करण्यापासून सावध राहा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

बुधदेव तुमच्या आठव्या घरात उदय पावत आहे. याच दरम्यान आर्थिक गोष्टीवरही लक्ष ठेवा. विमा, टॅक्स अशा गोष्टींशी निगडीत काही चुकीचे करु नका. कोणत्याही कागदपत्रांवर घाईघाईने सही करु नका. वैयक्तिक माहिती देण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्याच्या आधी माहिती जाणून घ्या. 

उपाय – कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी, तो काळजीपूर्वक वाचा आणि सावधगिरी बाळगा.    

धनु रास (Saggitarius Horoscope)

तुमच्या सातव्या घरात बुध उदय पावत आहे. नातेसंबंध आणि व्यवसायात सुधारणा करण्याची गरज आहे. मोठा निर्णय घेण्यापूर्वी लहान गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कायद्याचे कागदपत्रावर सही करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. 

उपाय – नेहमी संयम बाळगा आणि आपले बोलणे स्पष्ट आणि नेमके ठेवण्याचा प्रयत्न करा. 

मीन रास (Pisces Horoscope)

तुमच्या चौथ्या घरात बुध उदय पावत आहे. कौटुंबिक आणि संपत्तीच्या बाबतीत अशांतता असू शकते. घरात शांतता रोखून ठेवण्यासाठी आपल्या भावनांवर संयम ठेवा. घर आणि वाहन खरेदी करताना कोणतेही मोठे निर्णय घाईत घेऊ नका. घरच्या गोष्टीमुळे कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ देऊ नका.

उपाय : घरात नेहमी मिळून मिसळून राहा आणि घरातील सर्व सदस्यांसोबत काळजीपूर्वक काम करा.      

‘या’ राशींना पण राहावं लागेल सावधान    

मिथुन रास – मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींवर अडून राहू नका. 

कन्या रास – करिअरमध्ये नवीन संधी चालून येतील, पण कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टींचा विचार करा.   

मकर रास – कामाचा व्याप वाढू शकतो, म्हणून स्वतःला व्यवस्थित ठेवा आणि अनावश्यक दबावापासून दूर रहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :       

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा शेवटचा आठवडा कसा असणार? 6 पैकी 2 राशींसाठी आठवडा धोक्याचा; साप्ताहिक राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *