Atharva Sudame on Subodh Bhave: सुबोध भावेंचा न पाहिलेला अवतार, श्री गोंदवलेकर महाराजांची भूमिका चर्चेत; अथर्व सुदामेची शॉर्ट फिल्म कधी होणार रिलीज?


Atharva Sudame on Subodh Bhave Short Film: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यांनी आजतागायत अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांचं (Atharva Sudame) पुरेपूर मनोरंजन केलं. त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात येत आहे.  दरम्यान, सुबोध भावे सध्या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सुबोध भावे (Entertainment) लवकरच एका शॉर्ट फिल्ममधून (Short Film) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या खास शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने सुबोध भावे यांनी रिलस्टार अथर्व सुदामे याच्यासह काम केलं आहे. सध्या सुबोध भावे यांचा शॉर्ट फिल्मसाठीचा न्यू लूक सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

माहितीनुसार, रिलस्टार अथर्व सुदामेच्या शॉर्ट फिल्ममध्ये सुबोध भावे यांनी श्री गोंदवलेकर महाराज यांची भूमिका साकारली आहे.  अथर्व सुदामे याने अलिकडेच सुबोध भावे यांचे श्री गोंदवलेकर महाराज यांच्या वेशात असलेले फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. तसेच शॉर्ट फिल्म करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. तसेच सुबोध भावे यांचं विशेष कौतुक केलं आहे.  श्री गोंदवलेकर महाराज यांच्या कार्यावर आधारीत शॉर्ट फिल्म  करण्याचा विचार कसा मनात आला?  ही शॉर्ट फिल्म कशी तयार झाली? यावर अथर्व सुदाम याने खास पोस्ट लिहिली आहे. 

अथर्व सुदामेने आपल्या पोस्टमधून सुबोध भावे यांचं कौतुक केलं आहे (Atharva Sudame on Subodh Bhave Short Film Instagram post)

‘पूर्णब्रह्म…श्री गोंदवलेकर महाराज यांच्यावर एक शॉर्ट फिल्म करायची… हा विचार माझ्या मनात खूप दिवसांपासून होता.  खरंतर, महाराजांवर माझी नितांत श्रद्धा आहे.  मी त्यांना मनापासून मानतो. त्यांचं कार्य एका छोट्याशा प्रयत्नातून लोकांसमोर मांडावं, अशी माझी इच्छा होती. तशीच आणखी एक इच्छा होती की, महाराजांची भूमिका अशा व्यक्तीने साकारावी, ज्यांना मी स्वतः तितकाच मानतो. ते नाव म्हणजे अभिनेते सुबोध भावे. त्यांना मी स्क्रिप्ट पाठवली होती.  मी पाठवलेली स्क्रिप्ट त्यांना आवडली’.

‘सुबोध भावे यांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार.. ते केवळ अनुभवायचं असतं.  शूटिंग अतिशय सुंदररित्या पार पडलं होतं. सुबोध भावे सरांचा मला फोन आला होता. त्यांनी मला, ‘झालं ना तुझ्या मनासारखं.. जे काही डोक्यात होतं ते तसं झालं ना?’ मी, हो, अगदी मनासारखं झालं, असं म्हणालो. मग मी त्यांना मानधनाबद्दल विचारलं. तेव्हा ते हसले अन् म्हणाले की,  ‘याचा काहीही संबंध नाही. अरे तू किती चांगलं काम करतो आहेस’, हे ऐकून मी काही वेळ नि:शब्द झालो. ‘

”तू काहीतरी चांगलं काम करतोयस… कर. मी आहे’, त्या दिवशी ते शब्द सुबोध सरांच्या तोंडून ऐकले… पण मला त्यात गोंदवलेकर महाराजांचाच आशीर्वाद ऐकू आला होता. एक माझे आराध्य गोंदवलेकर महाराज… अन् दुसरे सुबोध भावे सर.’, असं म्हणत अथर्व सुदामे याने सुबोध भावे यांचं कौतुक केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

विद्यार्थी आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, पोलिसांनी खेचून पोलीस व्हॅनमध्ये नेलं, तरीही… VIDEO





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *